भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहतुकीला बढावा देण्यासाठी आले एकत्र
मुंबई - भारतात इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) तसेच वाहतुकीला अधिक स्वीकृती मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने, एमजी मोटर इंडिया व कॅस्ट्रॉल इंडिया जिओ-बीपीशी सहयोग करण्यास सज्ज आहेत. यातून इलेक्ट्रिक कार्ससाठी वाहतुकीची अधिक सोल्यूशन्स शोधण्यात मदत होणे अपेक्षित आहे. या भागीदारीतंर्गत जिओ-बीपी, एमजी मोटर आणि कॅस्ट्रॉल चारचाकी ईव्हींसाठी चार्जिंग संरचना उभारण्याच्या शक्यता पडताळून बघतील आणि ईव्ही ग्राहकांना सेवा देण्यासाठी कॅस्ट्रॉलचे सध्याचे वाहन सेवा नेटवर्क विस्तारण्यात येईल.
भारतात इलेक्ट्रिक कार्सच्या ग्राहकांना विस्तृत व खात्रीशीर चार्जिंग संरचना पुरवणे व त्यायोगे ईव्ही स्वीकृतीला वेग देणे यांच्याप्रती जिओ-बीपी व एमजी मोटर या कंपन्या मानत असलेल्या बांधिलकीशी ही भागीदारी सुसंगत आहे. ईव्ही मूल्यसाखळीतील सर्व भागधारकांना लाभ होईल अशी परिसंस्था जिओ-बीपी निर्माण करत आहे आणि गेल्या वर्षीच कंपनीने भारतातील सर्वांत मोठ्या ईव्ही चार्जिंग केंद्रांपैकी दोन उभारली व सुरू केली. या जॉइंट व्हेंचरचा इलेक्ट्रिक वाहतूक व्यवसाय भारतीय ग्राहकांना चार्जिंग संरचना देऊ करतो आणि जीओ-बीपी पल्स या ब्रॅण्डतंर्गत काम करतो. जिओ-बीपी पल्स या मोबाइल अॅपच्या माध्यमातून ग्राहक जवळपासची चार्जिंग स्टेशन्स सहज शोधू शकतात आणि तेथे आपले ईव्ही चार्ज करून घेऊ शकतात.
भारतात स्थापना झाल्यापासून एमजी मोटर शाश्वत भविष्यकाळ घडवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहतुकीबाबत वचनबद्ध आहे. या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट ईव्हींना पूरक असे रस्ते शहरांतर्गत तसेच दोन शहरांमधील प्रवासासाठी तयार करणे हे आहे. या दृष्टीने देशभरात दमदार ईव्ही चार्जिंग व सेवा संरचना स्थापित केली जाणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ४६१ किलोमीटर्सचा पल्ला पार करून देणारी भारतातील पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही झेडएस इव्ही बाजारात आणून एमजीने ईव्ही परिसंस्था बळकट करण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत.
या भागीदारीतंर्गत, कॅस्ट्रॉल आपल्या सध्या अस्तित्वात असलेल्या मल्टी-ब्रॅण्ड ऑटो सर्व्हिस नेटवर्क व एक्स्प्रेस ऑइल चेंज केंद्रांचा विकास व विस्तार करून तेथे इलेक्ट्रिक कार्सना सेवा देणे सुरू करेल. या सेवा भारतभरात जिओ-बीपी वाहतूक स्टेशन्सवर तसेच निवडक कॅस्ट्रो ऑटो सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये सुरुवातीला दिल्या जातील. याचा लाभ ईव्ही व नॉन-ईव्ही अशा दोन्ही प्रकारच्या चारचाकी गाड्यांना दिला जाईल. याशिवाय, आपल्या वाहन सेवा नेटवर्कमध्ये ईव्ही चार्जिंग संरचना स्थापित करण्यातही कॅस्ट्रॉल मदत करेल. ईव्हीची स्वीकृती वाढल्यानंतर कार मेकॅनिक्सनाही नवीन वाहन तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण देणे आवश्यक ठरेल. कार मेकॅनिक्सच्या मोठ्या वर्गाशी असलेल्या आपल्या संपर्काचा लाभ कॅस्ट्रॉल घेईल आणि त्यांना विशेष ईव्ही प्रशिक्षण व प्रमाणन देऊ करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.