एफडीपेक्षा जास्त व्याज! जोखीमही नाही, मिळवा भरघोस परतावा

Investment
InvestmentSakal
Updated on
Summary

23 सप्टेंबरपासून तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी एक नवीन आणि उत्तम पर्याय आहे.

- शिल्पा गुजर

तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 23 सप्टेंबरपासून एक नवीन आणि उत्तम पर्याय आहे. जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्सने (JM Financial Products) त्याचे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCD) जारी केले आहे, ज्यात14 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येते.

Investment
Amazon कडून नोकऱ्यांचा पाऊस, तब्बल 1,10,000 लोकांना देणार जॉब

जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स एनसीडी (JM Financial Products NCD): शेअर बाजारातील जोखमीमुळे गुंतवणूक करायला भीती वाटतेय? किंवा फिक्स्ड डिपॉझिट वरील कमी परताव्यांमुळे (Return) चिंतेत आहात, तर काळजी करु नका. 23 सप्टेंबरपासून तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी एक नवीन आणि उत्तम पर्याय आहे. यात तुम्हाला एफडीवर बँक देत असलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. जेएमच्या NCD मध्ये विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये 8.3 टक्के व्याज मिळणार आहे. कमाल परिपक्वता (Maximum Maturity) 100 महिन्यांची आहे.

Investment
भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सचा यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये डंका

इश्यूची साइज

जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरद्वारे 500 कोटी रुपये उभारणार आहेत. त्याच्या बेस इश्यूची साईज 100 कोटी असेल. 400 कोटींच्या ओव्हर सबस्क्रिप्शनचा पर्यायही असेल. म्हणजेच, इश्यूचा आकार 500 कोटी असू शकतो. कंपनी सुरक्षित NCD द्वारे पैसे गोळा करेल.

व्याज किती मिळणार ?

जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्समध्ये एनसीडीमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आहेत. 60 महिने (मासिक आधारावर व्याज), 60 महिने (वार्षिक आधारावर व्याज) आणि 100 महिने (वार्षिक आधारावर व्याज) असे पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये व्याजदर 7.91 टक्के, 8.20 टक्के आणि 8.30 टक्के आहेत. दुसरा पर्याय म्हणजे 39 महिन्यांचा आहे, ज्यात फ्लोटिंग व्याज दरांचा पर्याय असेल.

Investment
EVRE उभारणार 10 हजार चार्जिंग स्टेशन्स; तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी

किती गुंतवणूक करावी?

एका NCD ची इश्यू किंमत 1000 रुपये आहे. गुंतवणूकदारांना किमान 10 NCD मध्ये गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच किमान 10,000 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, तुम्ही 1 च्या मल्टिपलमध्ये पैसे गुंतवू शकता. त्याची लिस्टिंग स्टॉक एक्सचेंजवर असेल.

जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्सच्या NCD ला ICRA कडून AA/Stable (Stable Outlook) रेटिंग मिळाले आहे. त्याच वेळी, क्रिसिल (CRISIL) कडून AA/Stable (स्टेबल आउटलुक) रेटिंगही प्राप्त झाले आहे. जर तुम्ही रेटिंग बघितले तर NCD मध्ये पैसे गुंतवले जाऊ शकतात. हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो आहे.

Investment
HDFCकडून 'या' दराने मिळतंय फेस्टिव्ह होम लोन! ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

एनसीडी म्हणजे काय?

नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर अर्थात NCDs ही आर्थिक साधने आहेत. हे कंपनीद्वारे जारी केले जातात. याद्वारे ती गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते. यासाठी पब्लिक इश्यूं आणला जातो. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चित दराने व्याज मिळते. एनसीडीचा कार्यकाळ निश्चित आहे. त्यांच्या परिपक्वतेनंतर (Maturity), गुंतवणूकदारांना त्यांची मूळ रक्कम व्याजासह मिळते.

सुरक्षित एनसीडी म्हणजे त्याला कंपनीची सुरक्षा असते. जर कंपनी कोणत्याही कारणामुळे गुंतवणूकदारांना पैसे देऊ शकत नसेल, तर गुंतवणूकदार आपली मालमत्ता विकून त्यांचे पैसे काढू शकतात. असुरक्षित NCDs मध्ये, कंपनीकडून कोणतीही सुरक्षा नसते, त्यात जास्त धोका आहे.

Investment
टाटा, जिंदाल, हिंडाल्कोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण!

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()