Share Market News: हिंदुस्थान झिंक (Hindustan Zinc) ही देशातील सर्वात मोठी आणि जगातील दुसरी सर्वात मोठी झिंक-लीड खाण कंपनी गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर सिद्ध झाले आहे. 20 वर्षात केवळ 58 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर त्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या महिन्यात हा शेअर सुमारे 6 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. वेदांताची उपकंपनी हिंदुस्थान झिंकचा शेअर बीएसईवर मंगळवारी 280.60 रुपयांवर बंद झाला.
18 ऑक्टोबर 2002 रोजी हिंदुस्थान झिंकचे शेअर्स 1.62 रुपयांवर होते, जे 20 वर्षांत 173 पटीने वाढून 280.60 रुपये झाले आहेत. याचा अर्थ त्या वेळी 58 हजार रुपये गुंतवले असते तर आतापर्यंत त्याची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक झाली असती.
गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर 2021 रोजी हिंदुस्थान झिंकचे शेअर्स 407.90 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर होते, म्हणजेच सध्या त्याचे शेअर्स सध्या 45 टक्के सूटवर मिळत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उच्चांक गाठल्यानंतर, त्याच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली आणि यावर्षी, 6 जुलै 2022 पर्यंत, सुमारे 41 टक्क्यांनी घसरून त्याचे शेअर्स 242.40 रुपयांवर पोहोचले, जो 52 आठवड्यांचा नीचांक आहे. पण, त्यानंतर खरेदीचा कल वाढला आणि आतापर्यंत 16 टक्क्यांची तेजी यात दिसत आहे.
हिंदुस्थान झिंक ही देशातील सर्वात मोठी झिंक-लीड मायनिंग कंपनी आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. प्रायमरी झिंक उद्योगात त्यांचा 78 टक्के मार्केट हिस्सा आहे. ही कंपनी चांदीही काढते. हिंदुस्थान झिंक ही जगातील सहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. हिंदुस्थान झिंकमध्ये वेदांताचा 64.9 टक्के आणि भारत सरकारचा 29.5 टक्के हिस्सा आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.