नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या (एनबीएफसी) क्षेत्रातील प्रसिद्ध ‘मॅग्मा फिनकॉर्प’ या कंपनीचा ताबा आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील कंपनीकडे गेल्यानंतर या कंपनीचे ‘पूनावाला फिनकॉर्प’ या नावाने रि-ब्रँडिंग करण्यात आले. दरम्यानच्या गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने तेजीची जोमदार वाटचाल केल्याचे दिसून येते. या कंपनीचे तिमाही निकालही नुकतेच जाहीर झाले आहेत. पूनावालांनी या कंपनीचा ताबा घेऊन आता नव्या टीमसह जोमाने कामाला सुरवात केल्याने या कंपनीकडे आणि पर्यायाने कंपनीच्या शेअरकडे तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर या कंपनीविषयीचे आणि शेअरविषयीचे विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरते.
पुण्यातील पूनावाला समूहाच्या अधिपत्याखालील ‘पूनावाला फिनकॉर्प’ या कंपनीने नव्याने कात टाकून भक्कम टीमच्या जोरावर आपली भविष्यकालीन वाटचाल आश्वासक असेल, असे संकेत दिले आहेत. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा यांच्या गतिशील नेतृत्वाखाली कंपनीची उत्तम वाटचाल सुरू आहे. श्री. भुतडा यांच्याबरोबरील चर्चेत त्यांनी कंपनीच्या मूलभूत गोष्टींविषयी माहिती दिली. त्याआधारे मी आधी ‘फंडामेंटल्स’ मांडेन आणि त्यानंतर ‘टेक्निकल ॲनालिसिस’ करून पुढे आलेला विचार मांडेन.
या कंपनीमध्ये मे २०२१ मध्ये प्रवर्तकांनी रु. ३४५६ कोटींच्या मूल्याची शेअर गुंतवणूक केली आहे. या कंपनीची उपकंपनी असलेल्या ‘पूनावाला हाउसिंग फायनान्स लि.’मध्ये रु. ५०० कोटींची गुंतवणूक केली गेली आहे. कंपनीमध्ये परदेशी वित्तीय संस्था, देशांतर्गत गुंतवणूकदार व इतरांचा २७.८ टक्के समभाग हिस्सा असून, स्वतः प्रवर्तकांकडे ७३.२० टक्के शेअर आहेत. यावरून प्रवर्तकांचा या व्यवसायामधील सहभाग आणि विश्वास लक्षात येतो.
आता आपण ‘फंडामेंटल्स’मधील ठळक मुद्दे
सर्वप्रथम कंपनीने युनिफाईड लोन ओरिजिनेटिंग सिस्टीम, लोन मॅनेजमेंट सिस्टीम आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असे आधुनिक प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रस्थापित केले आहेत.
बहुतांश बॅंक कर्जांना ‘रि-प्राईज’ केले आणि वाढते कर्जाचे प्रमाण जवळपास सात टक्क्यांपर्यंत आणले.
को-ब्रँडेड क्रेडिट कार्डची तयारी पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया जोरात सुरू.
ही कंपनी सर्वाधिक ‘कॅपिटल बेस’ असलेल्या कंपनीपैकी एक.
कंपनीकडे आणिबाणीसारख्या परिस्थितीसाठी पुरेसे नियोजन.
कमी ‘लिव्हरेज’ असलेले उत्तम ‘कॅपिटलाइज्ड बॅलन्सशिट’.
केअर ‘एएए’ रेटिंग असलेल्या ‘फ्लॅगशिप’ कंपनी सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचा भक्कम आधार
‘रिस्क ॲडजेस्टेड’ परताव्यासाठी प्रॉडक्टची विस्तृत श्रेणी.
वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी कंपनीने तीन टप्पे ठरविले आहेत, जे पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आहे.
CONSOLIDATE ः यामध्ये पहिल्या नऊ महिन्यांत सर्व यंत्रणा भक्कम करणे, नव्या शाखा उघडणे, टीमचा विस्तार करणे, प्रॉडक्ट्समध्ये नावीन्य आणणे आदी गोष्टी अंतर्भूत असतील.
Grow ः पुढील नऊ महिन्यांतील डिजिटल क्षमता वाढविणे, डी-टू-सी मॉडेल तयार करणे, रिस्क मॅनेजमेंट आणि आॅटोमेशन प्रोसेसमध्ये सुधारणा करणे.
Lead ः या क्षेत्रातील निवडक प्रॉडक्ट्समध्ये सर्वाधिक ग्राहक मिळवणे, रिस्क मॅनेजमेंट आणि प्रोसेस आॅटोमेशनमध्ये या क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी बनणे.
या टप्प्यांबद्दल सांगताना श्री. भुतडा म्हणाले, की कंपनी सध्या प्री-ओन्ड कार्स, बिझनेस लोन, ॲफोर्डेबल होम लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, पर्सनल लोन या क्षेत्रामध्ये कार्यरत असून, याबरोबरच आगामी तीन तिमाहींत मेडिकल इक्विपमेंट लोन, मशिनरी लोन, कन्झ्युमर ड्युरेबल्स, सप्लाय चेन फायनान्स, को-लेंडिंग या क्षेत्रांत सुद्धा जाणार आहे. तसेच पाच ते सहा वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर ‘कॉर्पोरेट टाय-अप’बद्दल बोलणी चालू आहेत.
‘फंडामेंटल’ निकष पाहूया
आताचा ‘एयूएम’ रु. १४,४२४ कोटी आहे.
‘कंटिन्यूड प्रॉडक्टस’चा ‘एयूएम’ मागील वर्षापेक्षा साधारण सहा टक्के वाढला आहे.
‘नेट इंटरेस्ट मार्जिन’ (एनआयएम) मागील वर्षी ६.८ होते, ते ७.९ टक्के झाले आहे.
यंदाच्या पहिल्या तिमाहीत करपूर्व नफा रु. ८१ कोटी आहे, जो मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रु. ४७ कोटी होता. म्हणजेच ७२ टक्क्यांनी वाढला आहे.
‘क्रेडिट कॉस्ट’मध्ये सुधारणा झाली असून, ती ५.८ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांवर आली आहे व कमी करण्याचे प्रयत्न आहेत.
कंपनीकडे सध्या (जून २०२१) रु. ३२३८ कोटींची ‘लिक्विडिटी’ आहे, जी पुढील प्रगतीसाठी वापरता येऊ शकेल.
कंपनीचा ‘सीआरएआर’ हा मागील वर्षापेक्षा दुपटीहून अधिक वाढला आहे.
कर्ज वितरण, लिव्हरेज आणि नेटवर्थमध्ये सुद्धा चांगली वाढ दिसून येत आहे.
‘कोविड’च्या परिस्थितीसाठी रु. २८३ कोटींची तरतूद केलेली आहे.
वसुलीचे प्रमाण पुन्हा ‘कोविड’पूर्व स्थितीत असलेल्या आकडेवारीनुसार होण्यास सुरवात झाली आहे.
वरील सर्व माहिती आपल्याला असे दर्शविते, की ही कंपनी ‘फंडामेंटली’ उत्तम आहे.
वरील सर्व माहिती ही सध्याच्या कंपनीची असून, श्री. भुतडा यांनी कंपनीची पुढील काही वर्षांत काय उद्दिष्टे असणार आहेत, यावरही प्रकाश टाकला. त्यातील काही ठळक मुद्दे -
तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व यंत्रणेत आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यास बांधील
२०२५ पर्यंत ग्राहक व लघू उद्योग वित्तसाह्य क्षेत्रातील आघाडीच्या तीन कंपन्यांपैकी एक बनणे.
कंपनीची आताची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) २०२५ पर्यंत तिप्पट करणे.
‘बॉरोईंग कॉस्ट’मध्ये २.५ टक्क्यांची कपात करणे.
निव्वळ थकीत कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी करणे.
आता आपण टेक्निकल ॲनालिसिसबद्दल बोलूया.
‘लाँग टर्म चार्ट’ बघितल्यास असे लक्षात येते, की शेअर भावाने या ‘चेंज ओव्हर’नंतर आधीचे सर्व उच्चांकी भाव तोडून वरच्या दिशेला ‘ब्रेक आऊट’ दिला आहे.
मागील काही दिवसांत ‘व्हॉल्युम’मध्ये विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात मागणी दर्शविते, जी पुढील वाटचालीस पूरक आहे.
‘टेक्निकल ॲनालिसिस’मधील ‘इंडिकेटर’सुद्धा या मोठ्या ‘ट्रेंड’साठी पूरक दिसत आहेत.
वरील निकषांचा आलेख या शेअरभावात येणाऱ्या मोठ्या तेजीची सुरवात दर्शवीत आहे.
मागणी आणि पुरवठ्याचा चार्ट पाहिल्यास सध्याचा भाव (रु. १९०) ते रु. १६० या दरम्यान खरेदीसाठी योग्य ‘बाईंग झोन’ तयार झाला आहे आणि या शेअरच्या भावाचे अंदाजे रु. ६०० हे उद्दिष्ट आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत गाठले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ सध्याचा शेअरभाव पुढील ३-४ वर्षांत तिप्पट होण्याची शक्यता आहे. सध्याचा भाव ते रु. १६० आणि ‘अप ट्रेंड’मध्ये जेव्हा जेव्हा ‘करेक्शन’ येईल, तेव्हा हा शेअर खरेदी करण्यास हरकत नाही.
डिस्क्लेमर - या कंपनीचे शेअर माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक पोर्टफोलिओमध्ये असून, मी माझ्या ग्राहकांनासुद्धा यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत नामवंत गुंतवणूक सल्लागार आहेत. SEBI Reg. No. INH 000000958)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.