Currency Notes Exchange Rules : काही वेळा चुकून आपल्या जवळच्या नोटा फाटल्या जातात. तुमच्याबाबतीतही असेच कधीतरी नक्की घडले असेल. याचे कारण काहीही असू शकते, अशा वेळी ही नोट जितकी मोठी तितके नुकसान जास्त असते. जर का ही नोट 2000 ची असेल तर आणखीनच जास्त नुकसान होते. पण आता दोन हजाराच्या नोटा खराब झाल्यास किंवा फाटल्यास तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण आरबीआय (RBI) च्या म्हणण्यानुसार, तुम्ही बँकेत जाऊन या नोटा बदलून घेऊ शकता.
नोटा बदलून मिळाल्याने तुमचे फार नुकसान होणार. मात्र, त्या बदल्यात तुम्हाला त्याबदल्यात पूर्ण पैसे मिळतीलच असे नाही. यासाठी अनेक नियम करण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या नियमांच्या आधारे तुम्ही 2000 च्या फाटलेल्या नोट बदलून मिळवू शकता आणि स्वतःचे नुकसान टाळू शकता?
फाटलेल्या नोटांबाबत RBI चा नियम
आरबीआयने नोट रिफंड नियम 2009 - Reserve Bank of India (Note Refund) Rules, 2009 - मध्ये फाटलेल्या नोटांबाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या अंतर्गत नोटेच्या स्थितीनुसार खराब झालेल्या नोटा बदलून दिल्या जातात. तुम्ही RBI कार्यालये किंवा देशभरातील नियुक्त बँक शाखांना भेट देऊन ते बदलू शकता.
फ्री मध्ये होईल काम
आरबीआयच्या नियमांनुसार, बँका फाटलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत. याशिवाय प्रत्येक बँकेला याबाबत माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, नोटा जाणूनबुजून खराब झाल्याचा किंवा त्या जाळल्या गेल्याचा बँकेला संशय असल्यास, त्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोट 88 स्क्वेअर सेंटीमीटर (88 सेमी) असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील, तर 44 स्क्वेअर सेंटीमीटरवर तुम्हाला फक्त अर्धे पैसे दिले जातील. काही वेळा बँकेच्या एटीएममधून २००० च्या खराब नोटा वितरीत केल्या जातात. अशा परिस्थितीत, ते सहज बदलता यावे, म्हणून आरबीआयने फाटलेल्या नोटांसाठी नोट परत करण्याचे नियम बदलले आहेत. याशिवाय, जर तुम्हाला बँकेच्या एटीएममधून खराब नोट मिळाली तर तुम्ही संपूर्ण पावती आणि ट्राजेक्शन दाखवून बँकेकडून नोटा पूर्णपणे बदलून घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.