'या' लोकांकडून हिरावला जाणार फॅमिली पेंशनचा अधिकार; जाणून घ्या नियम

 family pension
family pensionpension
Updated on

Family Pension New Rule : केंद्र सरकार (Central Government) फॅमिली पेन्शनच्या माध्यमातून देशातील अनेक कुटुंबांना मदत करते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार, पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेंशन मिळते. मात्र, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने फॅमिली पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे. माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालयाने पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.

आता यांना नाही मिळणार पेन्शन?

16 जून 2021 रोजी, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOP&PW) एक महत्त्वाची अट नमूद केली होती की, हा अधिकार फॅमिली पेन्शन घेणार्‍या कुटुंब सदस्याकडून काढून घेतला जाऊ शकतो. यानुसार, फॅमिली पेंशन घेणार्‍या सदस्यावर सरकारी कर्मचार्‍याच्या हत्येचा आरोप असल्यास किंवा अशा कोणत्याही गुन्ह्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असल्यास, अशा परिस्थितीत कुटुंबातील इतर पात्र सदस्यांना पेन्शन देता येते.

माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालयाने 05 जानेवारी 2022 रोजी सशस्त्र दल निवृत्तीवेतनधारकांसाठी DoP&PW च्या मेमोरँडममध्ये असलेल्या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत, आवश्यक बदलांसह, 16 जून 2021 पासून लागू करण्याबाबत आदेश जारी केला आहे. ही तरतूद 16 जून 2021 पासून लागू होईल.

 family pension
जिओचा सर्वात स्वस्त Disney+ Hotstar देणारा प्लॅन, डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

जुना नियम काय होता

आतापर्यंत केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम Central Civil Services (Pension) Rules, 1972 च्या नियम 54 च्या उप-नियम (11C) नुसार, जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असेल तर निवृत्तीवेतनधारक, सरकारी कर्मचारी/पेन्शनधारकाच्या हत्येचा किंवा अशा गुन्ह्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असल्यास, या संदर्भात फौजदारी कारवाईचा निर्णय होईपर्यंत निवृत्ती वेतन निलंबित केले जाईल.

अशा प्रकरणांमध्ये, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील असलेल्या व्यक्तीशिवाय कुटुंबातील कोणत्याही पात्र सदस्यास पेन्शनचे पैसे देणे बंद करण्यात येते, जोपर्यंत त्या गुन्ह्याच्या कार्यवाहीवर निर्णय घेतला जात नाही. तसेच, या फौजदारी खटल्यांमध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर, त्या व्यक्तीला कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळत नाही. अशा स्थितीत, कुटुंब निवृत्ती वेतन सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या तारखेपासून कुटुंबातील इतर पात्र सदस्यांना मिळते. मात्र, जर संबंधित व्यक्ती नंतर आरोपातून निर्दोष मुक्त झाली असेल, तर सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या तारखेपासून कुटुंब निवृत्तीवेतन त्या व्यक्तीला देय होईल.

 family pension
7 जानेवारीआधी हे काम करा, अन्यथा सिम कार्ड होईल ब्लॉक

फॅमिली पेंशनचे नवीन नियम काय आहेत?

जर फॅमिली पेंशन घेणार्‍या व्यक्तीवर सरकारी कर्मचार्‍याच्या हत्येचा किंवा प्रवृत्त केल्याचा आरोप असल्यास, फॅमिली पेंशन फक्त कुटुंबातील इतर पात्र सदस्यांनाच दिले जाईल, जोपर्यंत आरोपीबद्दल अंतिम निर्णय होत नाही.

 family pension
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.