- शिल्पा गुजर
एअरटेल पेमेंट्स बँकेत (Airtel Payments Bank - APBL) असलेले 20 कोटी शेअर्स भारती एंटरप्रायजेस लिमिटेडला (Bharti Enterprises Ltd) 294 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीने विकणार असल्याचे भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) सांगितले.
एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये असलेले 20,00,00,000 इक्विटी शेअर्स भारती एंटरप्रायजेस लिमिटेडला विकण्यासाठी कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बँकेने शेअर खरेदी करार केला आहे. कोटक महिंद्राने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली. 2016 ते 2017 दरम्यान हप्त्यांमध्ये 200 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे हे शेअर्स विकत घेण्यात आले होते. ही विक्री 15 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या प्रस्तावित व्यवहारासाठी कोणत्याही सरकार किंवा नियामकाकडून (regulatory) मान्यता घेण्याची गरज नाही, असेही बँकेने म्हटले आहे. प्रस्तावित व्यवहार पुढे नेण्यासाठी भारती एंटरप्रायजेसला आरबीआयकडून (RBI) ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
1 एप्रिल 2010 रोजी पेमेंट बँकांसाठी आरबीआय परवान्यात एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडचा (ABPL) समावेश करण्यात आला होता. एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडने (ABPL) 23 नोव्हेंबर 2016 पासून पेमेंट बँक म्हणून आपला व्यवसाय सुरू केला. 2019-20 या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 627.19 कोटी रुपये होती.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.