'या' 4 स्पेशॅलिटी केमिकल्स स्टॉक्सना कोटक सिक्युरिटीजकडून खरेदी रेटिंग

Kotak Securities
Kotak Securitiesesakal
Updated on
Summary

कोटक सिक्युरिटीजने या उद्योगाशी संबंधित चार शेअर्सना खरेदी रेटींग दिले आहे.

- शिल्पा गुजर

चीनमधील वाढत्या उत्पादन खर्चाचा (Manufacturing Cost) फायदा विशेष रसायनांच्या उद्योगाला (Speciality Chemicals Industry) होऊ शकतो.

चीनमधील वाढत्या उत्पादन खर्चाचा आणि इतर घटकांचा फायदा देशातील विशेष रसायनांच्या उद्योगाला (Speciality Chemicals Industry) मिळण्याचा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्म कोटक सिक्युरिटीजने या सेगमेंटचे कव्हरेज सुरू केले आहे. पुढच्या दशकात देशाच्या रसायन उद्योगाचा (Chemicals Industry) व्यवसाय आंतरराष्ट्रीय खरेदी बाजारात वेगाने वाढू शकतो असे कोटक सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. कोटक सिक्युरिटीजने या उद्योगाशी संबंधित चार शेअर्सना खरेदी रेटींग (Buy Rating) दिले आहे.

Kotak Securities
कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना आणणार- पंतप्रधान मोदी

आरती इंडस्ट्रीज

- कोटक सिक्युरिटीजने या कंपनीचे कव्हरेज बाय रेटिंगसह सुरू केले आहे. त्याचे स्टॉक सध्या 935 रुपयांच्या जवळ आहे आणि ते आणखी 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकताच असा अंदाज कोटक सिक्युरिटीजला आहे.

विनती ऑर्गेनिक्स

- या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 56 टक्क्यांनी वाढला आहे, पण तो आणखी वाढू शकतो, असा विश्वास विश्लेषकांना वाटत आहे. त्याची किंमत सध्या सुमारे 1,885 रुपये आहे आणि आणखी 15 टक्के वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.

Kotak Securities
आधार कार्डद्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या...

एसआरएफ (SRF)

- या कंपनीकडे निर्यात बाजारात नवीन व्यवसाय वाढवण्याची क्षमता आहे आणि हीच या कंपनीची मोठी क्षमता असल्याचे कोटक सिक्युरिटीजला विश्वास आहे. त्याचा स्टॉक सध्या सुमारे 11,144 रुपयांवर आहे आणि तो आणखी 7 टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पीआय इंडस्ट्रीज

- फार्मा व्यवसायातील संशोधन आणि विकासातून (Research and Development) कंपनीचा महसूल वाढेल असा विश्वास आहे. युरोप आणि जपानमधील काही मोठ्या औषध कंपन्यांना API निर्यात करण्याची योजना आहे. त्याच्या शेअरची किंमत सध्या सुमारे 3,158 रुपये आहे आणि ती आणि 10 टक्क्यांनी वाढू शकते असा अंदाज आहे.

Kotak Securities
Amazon कडून नोकऱ्यांचा पाऊस, तब्बल 1,10,000 लोकांना देणार जॉब

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()