Reserve Bank of India KYC Rules : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) KYC बाबत बँकांसाठी नवीन आदेश जारी केला आहे. आरबीआयकडून सांगण्यात आले की, जर तुम्ही एकदा केवायसी केले असेल तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी पुन्हा शाखेत जाण्याची गरज नाही.
असे मध्यवर्ती बँकेच्या वतीने सांगण्यात आले. त्याचप्रमाणे खातेदाराचा पत्ता इत्यादी देखील अपडेट करता येतात.
रिझर्व्ह बँकेकडून बँकांना सांगण्यात आले आहे की, ग्राहकाच्या री-केवायसीसाठी ग्राहकाने बँकेत जाणे आवश्यक नाही. या परिस्थितीत खातेदाराला ईमेल-आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल चॅनलद्वारे केवायसीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
आरबीआयच्या वतीने असे सांगण्यात आले की, जर पत्त्यात बदल झाला असेल तर ग्राहक आपला अपडेट केलेला पत्ता कोणत्याही माध्यमातून बँकेत जमा करू शकतो. यानंतर दोन महिन्यांत बँकेने घोषित केलेल्या पत्त्याची पडताळणी केली जाईल.
हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
रिझर्व्ह बँकेने पुढे म्हटले आहे की, बँकांना वेळोवेळी त्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे, काही प्रकरणांमध्ये, केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल.
हे फक्त अशाच प्रकरणांमध्ये घडते जेव्हा कागदपत्रांची यादी उपलब्ध नसते किंवा KYC साठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची वैधता संपलेली असते. अशा प्रकरणांमध्ये बँकेला ग्राहकाने तयार केलेली केवायसी कागदपत्रे घेणे आवश्यक आहे.
केवायसी का आवश्यक आहे?
वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा KYC अपडेट करण्यास सांगत असत. मात्र आता अनेक बँका तीन वर्षां नंतर KYC अपडेट करत आहेत.
असे करा केवायसी :
केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्त्याचा पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागतो. ई-मेल पाठवूनही ग्राहक हे काम पूर्ण करू शकतात. तसेच, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या वतीने कोणत्याही खातेधारकाला कॉल केला जात नसल्याचे बँकेने सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा कॉलबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.