ओळख आर्थिक सल्लागाराची

ओळख आर्थिक सल्लागाराची
Updated on

काही दिवसांपूर्वी ‘सेबी’ने रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर २०१३ कायद्यात काही नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला. सर्वसामान्य गुंतवणूकदार या सर्व गोष्टींबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत. अनेकांना आर्थिक सल्लागार म्हणजे नक्की काय, हेसुद्धा पुरेसे माहीत नसते. आज आपण त्यावरच थोडा प्रकाश टाकणार आहोत.

‘सेबी’च्या नियमाप्रमाणे, ‘सेबी’कडे ज्यांची नोंदणी झालेली आहे, तेच आर्थिक सल्लागार आहेत. ‘सेबी’ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर (आरआयए) हे फक्त फी घेऊन सल्लासेवा देतात, ते वितरक (डिस्ट्रिब्युटर) म्हणून काम करीत नाहीत आणि ते कमिशन घेत नाहीत. 

आज आपण आर्थिक सल्लागार आणि त्याचे शिक्षण, सर्टिफिकेशन, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

सांगितलेल्या यादीमध्ये, सीएफए आणि सीए हे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाबरोबरच लेखापाल म्हणून पण काम करतात. पण काही सीएफए आणि सीए हे गुंतवणूक सल्लागार म्हणूनही काम करतात म्हणून येथे त्यांचा समविष्ट केला आहे. तसेच वर दिलेल्या यादीमधील काही जण, जसे की सीएफपी, सीडब्ल्यूएम, सीएफए आणि सीए हे म्युच्युअल फंडाचे वितरक किंवा विमा एजंट म्हणूनही काम करू शकतात किंवा करतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड वितरक, इन्शुरन्स एजंट आणि इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर हा पेशा आहे आणि सीएफपी, सीडब्ल्यूएम, सीएफए व सीए हे व्यावसायिक शैक्षणिक प्रमाणपत्र आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर होण्यासाठी सीफपी किंवा सीडब्ल्यूएम होणे बंधनकारक नाही. ‘सेबी’ने त्यासाठी काही प्रमाणपत्र परीक्षा (ज्या ‘एनआयएसएम’कडून घेतल्या जातात) बंधनकारक केल्या आहेत. सीएफपी, सीडब्ल्यूएम, सीएफए या प्रमाणपत्र परीक्षा घेणाऱ्या संस्था या आंतरराष्ट्रीय आहेत आणि बहुतेक पाश्चिमात्य देशांमध्ये या प्रमाणपत्र परीक्षा महत्वाच्या मानल्या जातात. आपण जेव्हा एखाद्या व्यासायिकाची सल्ला-सेवा घेतो, तेव्हा त्याचे ज्ञान तपासून पाहणे सर्वसामान्य माणसाला शक्य असेलच, असे नाही. अशा वेळी या सर्टिफाईड प्रोफेशनलचे ज्ञान हे एखाद्या विश्वासू व मान्यताप्राप्त संस्थेने तपासलेले असते आणि त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.

गुंतवणूक सल्लागार निवडताना फक्त ज्ञान किंवा शिक्षण पुरेसे आहे, असे नाही. त्याचा अनुभव, प्रामाणिकता, नैतिकता आणि पारदर्शताही तितकीच महत्त्वाची असते. आता सणासुदीचे दिवस येत आहेत. भेटवस्तू देणारे पण खूप भेटतील, जशी इंग्रजीत म्हण आहे “There is no such thing like free lunch”  तेव्हा भेटवस्तू किंवा तसे काही आमिष देणाऱ्या सल्लागारापासून सावध राहा. कारण, तुम्हाला तुमच्या सल्लागाराकडून उत्तम सल्ला मिळणे अपेक्षित आहे; भेटवस्तू नाही.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर - सीएफपी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.