Layoffs : आता आणखी एक कंपनी देणार 4000 कर्मचाऱ्यांना नारळ; वाचा काय आहे कारण?

एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत.
Layoffs
Layoffs Sakal
Updated on

Goldman Sachs Layoffs 2022: एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. आता अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी Goldman Sachs Group, Inc. आपल्या 4000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे.

जागतिक मंदीमुळे कंपनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून कंपनी मंदीच्या काळात खर्च कमी करून बाजारपेठेतील स्पर्धेत टिकू शकेल. रिटेल बँकिंग व्यवसायात कंपनीचे मोठे नुकसान होत आहे आणि अशा परिस्थितीत कंपनी समोर कर्मचारी कपात हाच एकमेव मार्ग आहे.

हेही वाचा : द वॉल ढासळतेय का?

कंपनी जगभरात 49,000 हून अधिक लोकांना रोजगार देत असल्याची माहिती आहे. सध्या कंपनीत सुमारे 81,567 कर्मचारी काम करतात.

या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 49,000 झाली होती. कंपनीचे सीईओ सॉलोमन म्हणाले की, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनी दरवर्षीच खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकते परंतु यावेळी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल.

Layoffs
Tech Layoff : 2008 च्या मंदीच्या तुलनेत 2022 मध्ये अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या

2023 मध्ये मंदीची शक्यता :

या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीतील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक टाळेबंदीव्यतिरिक्त असेल. सहसा बँकिंग कंपन्या दरवर्षी असे करतात. गोल्डमन कंपनी देखील 2023 मध्ये संभाव्य मंदीसाठी सज्ज आहे. सॉलोमन म्हणाले की गोल्डमनने 'काही खर्च कमी करण्याच्या योजना सुरू केल्या आहेत'. त्याचे फायदे जाणवायला थोडा वेळ लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.