Mutual Fund: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे, तर दुसरीकडे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) केलेली विक्री यामुळे एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात 15,890 कोटींची गुंतवणूक दिसून आली. नेट इनफ्लो वाढलेला हा सलग 14वा महिना आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, एप्रिलमधील इक्विटी म्युच्युअल फंडाचा प्रवाह मार्चमधील 28,463 कोटी रुपयांच्या विक्रमी निव्वळ प्रवाहापेक्षा कमी आहे. मार्च 2021 पासून इक्विटीमधील गुंतवणुकीशी संबंधित योजनांमधील निव्वळ आवक वाढत आहे. अशा योजनांबाबत गुंतवणूकदार सकारात्मक आहेत. याआधी जुलै 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत इक्विटी योजनांमधून सतत आउटफ्लो (46,791 कोटी) होता.
बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही स्तरावर मॅक्रो इंडिकेटर्सबद्दल भीती असताना अॅक्टिव्हिटीमध्ये स्थिर प्रवाह हा एक चांगला कल असल्याचे मोतीलाल ओसवाल एएमसीचे अखिल चतुर्वेदी म्हणाले. पण मागच्या महिन्याच्या तुलनेत गुंतवणूक कमी आली आहे. NFO वाटपामुळे ही गुंतवणूक कमी असू शकते. एसआयपी गुंतवणूक मजबूत राहते असे ते म्हणाले.
गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केटमध्ये सुरुवात करण्याची ही चांगली संधी असल्याचे व्हेंचुरा सिक्युरिटीज लि.चे संचालक जुझेर गबाजीवाला म्हणाले. तुम्ही सध्याच्या वातावरणात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कारण महागाईबाबत बरीच अनिश्चितता आहे.
बाजारातील ही सुधारणा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी संधीसारखी आहे. दुसरीकडे SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी त्यांची SIP चालू ठेवावी. बाजारातील घसरणीमुळे एसआयपी बंद करण्याचा निर्णय चुकीचा ठरेल. कारण एसआयपी लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून केली जाते आणि ही गुंतवणूक नेहमी चक्रवाढीचा लाभ देते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.