आधी खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर केला जात होता, परंतु अलीकडच्या काळात त्याची जागा 'बाय नाऊ पे लेटर'ने घेतली आहे.
आधी खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा (Credit Card) सर्वाधिक वापर केला जात होता, परंतु अलीकडच्या काळात त्याची जागा 'बाय नाऊ पे लेटर' (Buy Now Pay Later - BNPL) ने घेतली आहे. जर तुम्ही Amazon, Flipkart, Snapdeal, Myntra सारख्या ई-कॉमर्सद्वारे )E-Commerce) खरेदी करत असाल तर पेमेंटच्या वेळी तुम्ही Buy Now Pay Later चा पर्याय पाहिला असेल. हा पर्याय काय आहे, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? ते वापरणे योग्य आहे की नाही? हे जाणून घ्या... (Learn what is the profit and loss when using the Buy Now Pay Later option)
BNPL कार्ड म्हणजे काय
BNPL कार्ड प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (Prepaid Payment Instruments - PPIs) प्रमाणे काम करतात. क्रेडिटची एक लाइन असते आणि ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे न भरता खरेदी करण्यास मदत करतात. सुलभ अटी आणि इन्स्टंट ऍक्सेस यामुळे बीएनपीएलची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे औपचारिक पत उपलब्ध नाही त्यांच्यासाठी BNPL हा निधीचा एक स्रोत आहे जो त्यांना कठीण काळात मदत करतो.
क्रेडिट कार्डपेक्षा वेगळे BNPL कसे?
BNPL कार्ड आणि क्रेडिट कार्ड मुळात सारखेच आहेत. दोन्हीही ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करण्यात मदत करतात. पण दोघांमध्येही बरेच फरक आहेत. BNPL क्रेडिट चेकमध्ये फारसा गुंतलेला नाही, त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर (Credit Score) परिणाम होणार नाही. परंतु, पैसे भरण्यात तुम्ही अयशस्वी झाल्यास मोठा दंड होऊ शकतो आणि भविष्यात क्रेडिट मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. दुसरीकडे, क्रेडिट कार्ड तुमचा CIBIL स्कोअर चांगला किंवा वाईट बनवू शकतात. BNPL चा भारतातील प्रवेश मुख्यत्वे ऑनलाइन प्लॅटफॉर्मपुरता मर्यादित आहे.
काय आहेत BNPL चे फायदे?
अनेक कारणांसाठी फिनटेक कंपनीकडून (Fintech Company) बीएनपीएल कार्ड लॉंच करण्याचा विचार केला पाहिजे. त्याचा योग्य रीतीने वापर करून, व्यक्ती त्यांचे क्रेडिट प्रोफाइल तयार करून, वेळेवर परतफेड करून त्यांचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो. त्यांच्याकडे औपचारिक क्रेडिट स्कोअर नसला तरीही ग्राहक वैकल्पिक डेटाच्या आधारे क्रेडिट ब्यूरोकडून कार्ड मिळवू शकतात. याव्यतिरिक्त येन प्रॉडक्ट्स तुमच्या पैशाचा प्रवाह राखण्यास मदत करतात. बऱ्याचदा लोकांच्या आरोग्याच्या गरजा, शाळेची फी भरणे आदींसारखे अचानक खर्च होतात. हे मोठे खर्च 3 व्याजमुक्त पेमेंटमध्ये भरण्याची सोय मोठी मदत होऊ शकते.
तुम्ही BNPL सुविधेचा लाभ घ्यावा का?
BNPL ची मूलभूत तत्त्वे सोपी आहेत. ग्राहकांना मोठ्या किंवा किरकोळ खरेदीवर पेमेंट करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज मिळते. त्यामुळे ज्यांच्याकडे तत्काळ पैशांची कमतरता आहे त्यांच्यासाठी हे चांगले आहे. तथापि, कोणत्याही प्रकारचे क्रेडिट वापरण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की ग्राहकांना विहित कालावधीत रक्कम भरावी लागेल. तुम्ही पेमेंट चुकवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल, म्हणून ते काळजीपूर्वक वापरा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.