LIC चा सेबीकडे IPOसाठी अर्ज! मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिशियल पब्लिक ऑफर मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे
LIC IPO
LIC IPOLIC
Updated on
Summary

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिशियल पब्लिक ऑफर मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे

LIC IPO : देशातील सर्वात मोठ्या IPO साठी काउन्टडाऊन सुरु झाले आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने सेबीकडे IPO साठी अर्ज केला आहे. DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी ही माहिती दिली. LIC IPO साठी DRHP (ड्राफ्ट पेपर) दाखल करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिशियल पब्लिक ऑफर (LIC IPO) मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

आयपीओची साईज सुमारे 63 हजार कोटी रुपये असू शकते असं बोललं जात आहे. एकूण इक्विटीचा आकार 632 कोटी शेअर्सचा असेल. त्यातील 5 टक्के हिस्सा सरकार विकत आहे. सरकार सुमारे 31.6 कोटी शेअर्स विकणार आहे

LIC IPO
अदानी विल्मरचा आज IPO येणार, अदानींची 7वी कंपनी शेअर बाजारात येणार; पाहा व्हिडिओ

देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी होणार

सध्या एलआयसीमध्ये सरकारची 100 टक्के भागीदारी आहे. एकदा लिस्ट झाल्यानंतर, 8-10 लाख कोटी रुपयांच्या अंदाजे मुल्यांकनासह बाजार भांडवलाने देशातील सर्वात मोठी कंपनी बनू शकते इतकी क्षमता आहे. लिस्टिंगसाठी सरकारने LIC चे अधिकृत भांडवल (authorised capital) 100 कोटी रुपयांवरून 25,000 कोटी रुपये केले आहे.

LIC IPO
2022 मध्ये पैसा कमावण्याची बंपर संधी! येणार 60 हजार कोटींचा IPO

मर्चंट बँकर्स कोण आहेत ?

इतर निवडक बँकर्समध्ये एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड, जेएम फायनांशियल लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे. सिरिल अमरचंद मंगलदास यांची IPO चे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.