LIC चा आयपीओ जेव्हापासून मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून गुंतवणूकदार याकडे लक्ष ठेवून आहे. LIC चे शेअर वाटप कधी होणार, याकडे गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत.अशात आज एलआयसीचे शेअर वाटप होण्याची शक्यता आहे तर शेअर्सची यादी 17 मे रोजी सादर केली जाणार. (LIC is likely to finalise the IPO share allotment today)
देशातील सर्वात मोठ्या IPO ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे याबाबतीत होणाऱ्या छोट्या छोट्या हालचालीवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. तुम्हाला जर LIC च्या शेअर वाटपाची अपडेट तपासाची असेल तर तुम्ही बीएसईच्या (BSE) वेबसाइटवर किंवा IPO रजिस्ट्ररच्या (IPO registrar's ) वेबसाइटवर तपासू शकता.
बीएसई वेबसाइट (BSE Website)
१. इश्यू प्रकार इक्विटी निवडा आणि इश्यूचे नाव LIC निवडा
२. ॲप्लिकेशन नंबर' किंवा 'पॅन नंबर' भरा.
३. बॉक्स चेक करा (I'm not a robot) आणि शेवटी सर्च बटणावर क्लिक करा.
IPO रजिस्ट्रार वेबसाइट (IPO registrar's Website)
१. आयपीओ LIC निवडा
२. त्यानुसार 'ॲप्लिकेशन नंबर' किंवा DPID/Client ID किंवा पॅन नंबर भरा
३. कॅप्चा भरा आणि शेवटी 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
कंपनी 13 मे पर्यंत अपात्र गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात परतावा जमा करेल आणि इक्विटी शेअर्स 16 मे पर्यंत पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. अखेर शेअर्सची यादी 17 मे रोजी सादर केली जाणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.