LIC वर 75 हजार कोटींची कर थकबाकी! IPO वर काय परिणाम

सरकार एलआयसीचा आयपीओ लॉन्च करण्याची तयारीत आहे.
LIC IPO
LIC IPOLIC
Updated on
Summary

सरकार एलआयसीचा आयपीओ लॉन्च करण्याची तयारीत आहे.

सरकार एलआयसीचा आयपीओ (IPO) लॉन्च करण्याची तयारीत आहे, तर दुसरीकडे एलआयसीकडून मोठा कर वसूल करण्यावरून वाद सुरू आहे. कंपनीवर सुमारे 75 हजार कोटी रुपयांचा टॅक्स देणं बाकी असल्याचे समोर आले आहे.

एलआयसीच्या ड्राफ्ट पेपरनुसार, LIC मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराची 63 मोठी प्रकरणे सुरू आहेत. यामध्ये केवळ प्रत्यक्ष कराची 37 प्रकरणे आहेत, ज्यातून 72,762.3 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. अप्रत्यक्ष कराच्या 26 प्रकरणांमधून 2,132.3 कोटी वसूल केले जाणार आहेत. अशा प्रकारे, कंपनीवर एकूण 74,894.5 कोटी रुपयांची कर थकबाकी असल्याचे समजते आहे. देशातील कोणत्याही एका कंपनीवर हा सर्वाधिक कर आहे.

LIC IPO
LIC चा सेबीकडे IPOसाठी अर्ज! मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा

कंपनी कर भरण्यासाठी आपले पैसे देऊ इच्छित नाही

एलआयसीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की ते कर दायित्वे भरण्यासाठी आपला फंड वापरणार नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्णय योग्य नसतात आणि यापुढेही त्याविरोधात अपील केले जाईल. या प्रकरणांमध्ये 24,728.03 कोटींचा समावेश आहे.

एलआयसीने आपली कमाई लपवली - आयकर विभाग

आयकर विभागाचे म्हणणे आहे की यापैकी बहुतेक प्रकरणे विवादित आहेत, कारण कंपनीने आपले एकूण उत्पन्न लपवण्याचे काम केले आहे. यातील अनेक प्रकरणे खुप वर्षे जुनी असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. कंपनीने 2005 नंतर अनेक वेळा आपले उत्पन्न योग्यरित्या जाहीर केले नाही, त्यामुळे वाद निर्माण झाले.

LIC IPO
LIC च्या या योजनेत दररोज 200 रुपये वाचवा! Maturityवर कमवा 28 लाख

गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल ?

जर या प्रकरणांमध्ये एलआयसी केस हरली आणि एलआयसीला कराच्या रूपात मोठा निधी द्यावा लागला, तर कंपनीच्या पब्लिक शेयरहोल्डर्सना मिळालेल्या परताव्यातही घट होऊ शकते. एवढेच नाही तर एलआयसीचा मार्केट शेअरही खाली येऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात त्याच्या कमाईवर परिणाम होईल. सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीकडे 26,122.95 कोटींची रोकड होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.