तुम्हाला सेवानिवृत्तीबद्दल काळजी वाटत असेल, तुमच्या बँक खात्यात पैसे असूनही विचार करीत असाल की काही पेन्शनची व्यवस्था करता येईल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एलआयसीची अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि त्या बदल्यात दरमहा २०,००० रुपये पेन्शन मिळते. या पॉलिसीची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसी घेताना पॉलिसीधारकाला संपूर्ण आयुष्यासाठी किती पेन्शन मिळेल याची माहिती दिली जाते. या योजनेत तुम्ही स्वतःसाठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी त्वरित गुंतवणूक करू शकता.
या योजनेत गुंतवणूक करताना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला पेन्शन घेणे निवडू शकता. या योजनेत इतरही अनेक फायदे आहेत. तुम्ही गुंतवणूक करताच पॉलिसी जारी केली जाते. तीन महिन्यांनंतर तुम्ही त्यावरील कर्जाच्या सुविधेचा लाभ देखील घेऊ शकता. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
पेन्शनसाठी करा इतकी गुंतवणूक
एलआयसीच्या जीवन अक्षय-VII पॉलिसीमध्ये एकूण दहा पर्याय दिले जातील. एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला एका प्रीमियमवर दरमहा २० हजार रुपये पेन्शन मिळते. तुम्हाला दर महिन्याला ही पेन्शन हवी असेल तर प्रति महिना हा पर्याय निवडावा लागेल. २० हजार रुपये दरमहा पेन्शन मिळविण्यासाठी अचूक गणितानुसार एकाच वेळी ४०,७२,००० रुपये गुंतवावे लागतील. तुमचे मासिक पेन्शन २०,९६७ रुपये होईल. वृद्धापकाळ आरामात काढण्यासाठी आवश्यक असलेल्या पेन्शनच्या रकमेनुसार दिलेल्या पर्यायांमधून स्वतःसाठी पर्याय निवडा आणि त्या आधारे रक्कम गुंतवा.
हे आहे विशेष
या पॉलिसीला सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल ॲन्युइटी पॉलिसी म्हणतात
यामध्ये किमान एक लाखाची गुंतवणूक करावी लागेल.
एक लाख रुपये जमा केले तर वार्षिक १२,००० रुपये पेन्शन मिळेल.
३५ ते ८५ वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात.
पेन्शनसाठी १० वेगवेगळे पर्याय दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.