LPG Cylinder : LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर, आजपासून 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

LPG Gas Cylinder
LPG Gas Cylinderesakal
Updated on
Summary

जूनच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

जूनच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 1 जून 2022 रोजी LPG गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमतीचे नवीन दर जाहीर केले आहेत. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं (Indian Oil Corporation, IOC) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केलीय, तर घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाहीय.

LPG Gas Cylinder
आनंदाची बातमी! 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, जाणून घ्या कसं

राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय (सबसिडी) 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 999.5 रुपयांवर कायम आहे. मुंबईतही (Mumbai) या सिलिंडरची किंमत 999.5 रुपये आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1026 रुपये आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 1015.50 रुपये आहे. गेल्या महिन्यात सर्वसामान्यांना मोठा झटका बसला होता. तेल कंपन्यांनी मे महिन्यात घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ केली होती. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 7 मे रोजी प्रथम 50 रुपयांनी आणि नंतर 19 मे रोजी 3.50 रुपयांनी वाढवण्यात आली.

LPG Gas Cylinder
ठरलं! आझमगडमधून डिंपल यादवांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

14 महिन्यांत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महागलं

एप्रिल 2021 पासून आतापर्यंत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 190 रुपयांनी वाढ झालीय. याआधी मार्च 2022 मध्येही एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याआधी 6 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांपर्यंत वाढ झाली होती.

LPG Gas Cylinder
लाईट बिल भरलं नाही म्हणून फोन आला तर सावधान, अन्यथा होईल मोठं नुकसान!

अशा प्रकारे गॅस सिलिंडरचे दर तपासा

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावं लागेल. इथं कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.