Share Market : 'हे' दोन स्टॉक खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला!

एखादा शेअर किती कालावधीसाठी होल्ड करायाचा, अर्थातच टायमिंग महत्त्वाचे आहे.
Share Market
Share Marketsakal media
Updated on
Summary

एखादा शेअर किती कालावधीसाठी होल्ड करायाचा, अर्थातच टायमिंग महत्त्वाचे आहे.

शेअर बाजारात (Share Market) चांगली कमाई करायची असेल तर चांगले शेअर्स घेणे महत्त्वाचे आहे. त्याहून महत्त्वाचे आहे ते म्हणजे एखादा शेअर किती कालावधीसाठी होल्ड करायचा, अर्थातच टायमिंग महत्त्वाचे आहे. कारण एखादा शेअर शॉर्ट टर्ममध्ये कमाई करुन देऊ शकतो तर एखादा लाँग टर्ममध्ये, त्यामुळेच किती कालावधीसाठी शेअर ठेवावा हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. ब्रोकरेज आणि संशोधन फर्म HDFC सिक्युरिटीजने महिंद्रा लॉजिस्टिक (Mahindra Logistics) आणि युटीआय एएमसी (UTI AMC) या दोन शेअर्सचा विचार करा असा सल्ला दिला आहे. शिवाय हे दोन्ही शेअर्स येत्या तीन महिन्यांत अतिशय चांगले परफॉर्म करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share Market
Share Market: या 10 शेअर्सवर ठेवा नजर; जाणून घ्या शेअर बाजाराचा मूड

सध्या महिंद्रा लॉजिस्टिक (Mahindra Logistics) या स्टॉकमधील फेब्रुवारीची तीव्र घसरण संपत चालली असे दिसून येत आहे. या स्टॉकचा किमतीचा चार्ट विकली टाइम फ्रेमवर 407 रुपयांच्या मोठ्या सपोर्टच्या दिशेने कूच करत आहे. HDFC सिक्युरिटीने महिंद्र लॉजिस्टिकला 465/502 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे. पुढील तीन महिन्यांत हा शेअर हे टारगेट आरामात गाठेल असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या, NSE वर महिंद्रा लॉजिस्टिकचा शेअर 434.45 रुपयांच्या जवळ दिसत आहे.

Share Market
शेअर मार्केट : कर न चुकवता श्रीमंत व्हायचंय?

युटीआय एएमसी (UTI AMC) हा स्टॉक त्याच्या पाच ट्रेडिंग दिवसांच्या कंसोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर पडत आहे, असे एचडीएफसी सिक्युरीटीजचे म्हणणे आहे. या किमतीच्या ब्रेकआउटसह, त्याच्या व्हॉल्यूममध्येही वाढ झाली आहे. 28 फेब्रुवारी 2022 रोजी, व्हॉल्यूममध्ये प्रचंड वाढ होऊन स्टॉक पाच टक्क्यांहून अधिक वाढला होता. RSI सारखे टेक्निकल इंडिकेटरदेखील या शेअरमध्ये मजबूत वाढ होण्याची चिन्हे दाखवत आहेत. अशा परिस्थितीत, या स्टॉकला बाय रेटिंग देताना, एचडीएफसी सिक्युरिटीने यासाठी 997 रुपयांचे टारगेट दिले आहे, तर 795 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या, NSE वर महिंद्रा लॉजिस्टिक्सचा 959.45 रुपयांच्या जवळ दिसत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.