चीनमध्ये क्रिप्टो करन्सीवर लादलेली बंदी आणि चिनी सरकारनी क्रिप्टो करन्सीच्या विरोधात घेतलेली कठोर भूमिका यामुळे पुन्हा एकदा क्रिप्टो मार्केट कोसळलेलं पाहायला मिळालं. जगभरातील सर्वात जास्त ट्रेड केली जाणारी क्रिप्टो करन्सी 'बिटकॉइन' आणि त्या खालोखाल सर्वात जास्त प्रसिद्ध क्रिपरी करन्सी 'इथेरियम' या दोन्ही काउंटरवर आज मोठी मंदी पाहायला मिळाली. जानेवारीनंतर पहिल्यांदाच बिटकॉईन सरळ नाकावर आपटत ३० हजार डॉलर्सच्या खाली कोसळला आहे. (major crash in crypto currency market bitcoin trading under 30 thousand dollars)
२४ तासात तब्बल ९ टक्क्यांची घसरण
'बिटकॉइन'च्या किंमतीत मागील २४ तासात तब्बल ९ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळतेय. बिटकॉइन सोबतच 'इथेरियम' या प्रसिद्ध डिजिटल क्रिप्टो करन्सीमध्ये देखील गेल्या चोवीस तासात तब्बल ८ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळते आहे. 'बिटकॉइन' आणि 'इथेरियम' सोबतच इतर क्रिप्टो करन्सीजमध्ये देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक पडझड 'डोज कॉईन या क्रिप्टोमध्ये पाहायला मिळाली. Dogecoin च्या किमती तब्बल २५ टक्क्यांनी घसरून थेट 0.17 डॉलर्सच्या खाली आल्या.
XRP मध्ये २० टक्के घसरण
पोल्काडॉट (Polkadot) मध्ये २१.७१ टक्के घसरण
बिटकॉइन कॅश मध्ये (Bitcoin Cash) १६. २८ टक्के घसरण
बिटकॉइनची किंमत २२ लाखांच्या खाली
भारतीय प्रमाणवेळेनुसार २२ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता बिटकॉइन ९.१८ टक्के घसरून २९ हजार ५७१ डॉलर्सवर ट्रेड करत होता. म्हणजेच एका बिटकॉइनची किंमत २२ लाखांच्या खाली आलेली. मागील आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीमध्ये तब्बल ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. क्रिप्टो हेज फंड ARK36 चे कार्यकारी संचालक म्हणतात की, "सध्या क्रिप्टो करन्सी बिटकॉइनमध्ये पडझड सुरु असल्याने गुंतवणूकदार बिटकॉइन पासून दूर राहणे पसंत करत आहेत"
इथेरियम १ हजार ८०२ डॉलर्सवर
भारतीय प्रमाणवेळेनुसार २२ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता 'इथेरियम'मध्ये ८.५५ टक्के घसरण पाहायला मिळाली होती. या पडझडीनंतर 'इथेरियम' १ हजार ८०२ डॉलर्सवर ट्रेड करत होता. तर दुरीकडे 'थेथर' क्रिप्टो करन्सी १ डॉलरवर ट्रेड करत होती. बिनान्स कॉईनमध्ये २१.२४ टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली. बिनान्स कॉईन २४०.२४ डॉलर्सवर ट्रेड होताना पाहायला मिळाला.
(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.