Share Market : 'या' मल्टीबॅगर स्पेशालिटी केमिकल स्टॉकबाबत मार्केट एक्स्पर्ट्सना विश्वास

शेअर एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर 144 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे.
share market sensex
share market sensexsakal
Updated on
Summary

शेअर एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर 144 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे.

एसआरएफ लिमिटेडच्या (SRF) शेअरची (Share)किंमत गेल्या तीन वर्षांत 76 टक्के CAGR ने वाढली आहे. कंपनी नवीन आणि जटिल क्षेत्रांमध्ये (जसे की फ्लोरो-केमिकल्स) विस्तार करण्यासाठी तिच्या मजबूत पेडेग्रीचा फायदा घेण्यासाठी तयार असल्याचा विश्वास ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजला आहे.

share market sensex
Share Market: आज कोणत्या 10 शेअर्सवर फोकस करावं? वाचा शेअर बाजाराचा कसा असेल मूड

एसआरएफ लिमिटेड (SRF) या मल्टीबॅगर स्टॉकला प्रति शेअर 3,065 रुपयांच्या टारगेटसह खरेदी रेटिंग (Buy Rating) दिले आहे. शेअर एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर 144 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे, तर यात 2022 मध्ये आतापर्यंत जवळपास 10 टक्के वाढ झाली आहे. अॅग्रोकेमिकल्स आणि फार्मामध्ये फ्लोरो-कंपाऊंड्सचा जास्त वापर लक्षात घेऊन विशेष स्पेशियालिटी केमिकल्सवर फोकस करण्यात आले आहे.

पॅकेजिंगमध्ये, कंपनीने आयातीच्या बदल्यात अॅल्युमिनियम फॉइलसाठी 425 कोटी रुपयांचा भांडवली खर्च (कॅपेक्स) राखून ठेवला आहे (अॅल्युमिनियम फॉइलची देशांतर्गत आयात सुमारे 4500 कोटी रुपये आहे). कंपनी आयात बाजारातील हिस्सा टारगेट करत आहे, ज्यामुळे शेअरच्या किमतीत पुढे आणखी वाढ होऊ शकते.

share market sensex
Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा छोटा पॅकेट बडा धमाका शेअर

एसआरएफ लिमिटेडची (SRF) स्थापना 1970 मध्ये झाली. एसआरएफने नायलॉन कॉर्ड टायरपासून (nylon cord tyre) केली आणि नंतर रेफ्रिजरंट वायू, स्पेशालिटी केमिकल्स आणि पॅकेजिंग फिल्म यासारख्या इतर क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय विस्तारला. कंपनीचा एकूण 43 टक्के महसूल रसायन विभागातून येतो, ज्यामध्ये पॅकेजिंग फिल्म्स (39टक्के), टेकनिकल टेक्सटाइल्स (15 टक्के) आणि इतर (3 टक्के) आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.