चिंताजनक बाब; परकी गंगाजळीतील घट गंभीर

रिझर्व्ह बँक : रुपया स्थिर ठेवण्याचे उपाय
matter of concern decline in foreign currency rbi bank finance mumbai
matter of concern decline in foreign currency rbi bank finance mumbaisakal
Updated on

मुंबई : रुपयातील घसरण रोखण्यासाठी देशाचा परकी चलन साठा वेगाने खर्च होत आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे मत काही अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा जानेवारी ते जुलै या कालावधीत रिझर्व्ह बँकेने ३८.८ अब्ज डॉलर परकी चलनाची विक्री केली आहे. योपैकी जुलैमध्ये १९ अब्ज डॉलरची विक्री करण्यात आली असून, ऑगस्टमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत ८०पेक्षा खाली गेल्याने त्याची आणखी घसरण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँक २०१३ मधील संकटकालीन कालावधीच्या तुलनेत रुपयाला बळ देण्यासाठी आता परकी चलन साठ्याचा वापर वेगाने करत आहे. रुपयातील अस्थिरता रोखण्यासाठी आणखी परकी चलन साठा कमी होणे हा मोठा धोका आहे," असे अर्थतज्ज्ञ गरीमा कपूर आणि शुभंकर संन्याल यांनी म्हटले आहे.

अमेरिकी रोख्यांची खरेदी कमी करण्याच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने २०१३ मध्ये रुपयासह विकसनशील देशांच्या चलनांवरील दबाव वाढला होता. त्यामुळे रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे १४ अब्ज डॉलरची विक्री केली होती. त्यापेक्षा अधिक विक्री सध्याच्या काळात झाली आहे. त्यावर्षातील परकी गंगाजळीपेक्षा आता चलनसाठा अधिक आहे.

देशाचा परकी चलन साठा ऑक्टोबर २०२१ मधील ६४२ अब्ज डॉलरवरून ५५० अब्ज डॉलर या दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. परकी चलन साठ्यात झालेली घट आणि आयातीतील वाढ यामुळे सध्याची परकी गंगाजळी सुमारे नऊ महिन्यांची आयातीसाठी पुरेशी आहे.

चिनी युआनच्या तुलनेत रुपया आठ टक्के वाढला आहे. ही महत्त्वाची बाब आहे. कारण चिनी निर्यात ही भारताच्या निर्यातीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशांतर्गत भारतीय उत्पादनासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी मानली जाते.

- माधवी अरोरा, एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मुख्य अर्थतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.