मुंबई : मर्सिडीज बेंझ इंडियाने आपली ‘इक्यूएस ५८० - ४ एमएटीआयसी’ही पहिली ‘मेड इन इंडिया ईव्ही’ बाजारात दाखल केली आहे. तिची किंमत एक कोटी ५५ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. ही मोटार जर्मनीखेरीज फक्त भारतातच तयार होत असून कंपनीची ही चौदावी ‘मेड इन इंडिया’गाडी आहे. ही ‘ईव्ही’ पूर्ण चार्ज केल्यावर ८५७ किमी अंतर कापू शकते, तर फास्ट चार्जिंग स्टेशनवर फक्त पंधरा मिनिटे चार्ज केल्यावर ती गाडी तीनशे किमी जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
तिला दोन वर्षांनंतर किंवा तीस हजार किमी धावल्यानंतर सर्व्हिसिंग मिळू शकेल. गाडीची वॉरंटी तीन वर्षांची असून बॅटरीची वॉरंटी आठ वर्षांची आहे. ही गाडी ताशी २१० किमी वेगाने धावू शकते. युरो एनसीएपी फाईव्ह स्टार सुरक्षा व्यवस्था असलेल्या या मोटारीत नऊ एअरबॅग असून यातील बॅटरी व हायव्होल्टेज यंत्रणा अपघातप्रसंगी आपोआप बंद होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.