मेस्सीने लावला क्रिप्टो करन्सीवर दाव; चर्चा तर होणारच!

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या प्रचंड चर्चेत आहे.
Lionel Messi
Lionel Messisakal media
Updated on

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या प्रचंड चर्चेत आहे. अर्थात त्याने बदललेल्या क्लबच्या निर्णयामुळे. मेस्सीने आतापर्यंत फुटबॉलच्या मैदानात केलेल्या कामगिरीने तो कायम चर्चेत राहिला. मात्र आता मेस्सी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. हा विषय आहे क्रिप्टो करन्सीचा. एकीकडे तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ वाढवणारी क्रिप्टो करन्सी आणि दुरीकडे लिओनेल मेस्सी हे रसायन आता जुळून आल्याने चर्चा तर होणारच. स्टार फुटबॉल खेळाडू मेस्सीची आता क्रिप्टो समर्थकांमध्ये एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळतेय.

मेस्सीचा नवीन क्लब PSG ने दिलेल्या माहितीनुसार, त्याला दिल्या गेलेल्या पॅकेजमध्ये फॅन टोकन्स देखील आहेत. यानंतर मेस्सीचं पॅकेज २.९ कोटी डॉलर्सवरून आता तब्बल ३.५ कोटी डॉलर्स होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. या आधीच टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी क्रिप्टो करन्सीसाठी समर्थन दर्शविले आहे.

बार्सेलोना क्लब सोडल्यानंतर अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच फ्रान्सच्या पीएसजी (PSG Club) सोबत करार केला आहे. दरम्यान, पीएसजीने मेस्सीच्या पॅकेजमध्ये नेमक्या किती टक्के टोकन्सचा हिस्सा आहे, हे स्पष्ट केलेलं नाही. मात्र, मेस्सीच्या पॅकेजमध्ये टोकन्सचा बऱ्यापैकी हिस्सा असल्याचं क्लबकडून सांगण्यात आलं आहे.

फॅन टोकन्स म्हणजे काय?

फॅन टोकन ही एक प्रकारची क्रिप्टो करन्सीच असते. या टोकन्सचा वापर टोकन धारकांना त्यांच्या क्लब संबंधी काही निर्णयांमध्ये मतदान करण्यासाठी करता येतो. या वर्षी इंग्लिश प्रीमियम लीगचा चॅम्पियन ठरलेल्या मँचेस्टर सिटी आणि इटलीच्या एसी मिलान यांनी स्वतःचं टोकन लाँच केले आहे. मेस्सीच्या माजी क्लब बार्सिलोनाने गेल्या त्यांचं स्वतःचं टोकन आणलं होतं. बिटकॉइन तसेच इतर डिजिटल चलनांप्रमाणे, फॅन टोकन देखील एक्सचेंजवर खरेदी तसेच विक्री करता येतात. त्यांच्या किमतींमध्येही मोठ्या प्रमाणात चढ उतार होतात.

क्रिप्टोकरन्सीसंदर्भात काही देशांमधील नियामकांकडून याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. चीनने अलीकडेच बिटकॉइनच्या मायनींगवर निर्बंध लादले आहेत. यामुळे बिटकॉईनच्या किमतीतही लक्षणीय घट देखील झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.