Money Saving Hacks : हातात पैसा आला की शॉपिंग आठवतंय? असे करा स्वत:च्या खर्चावर कंट्रोल!
हातात पैसा टिकत नाही,घरात पैसा राहत नाही, पैसा यायच्या आधीच त्याचं नियोजन लागलेलं असतं. अशा कारणांनी पैसा आला कधी अन् गेला कधी हे कळत नाही. अनेकजण खर्च करताना विचार करत नाही आणि मग पैसा अपूरा पडतो, अशी तक्रार करतात.
‘पैशाने पैसा वाढतो’ असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके रिटर्नस जास्त मिळतील, असे सोप्पे गणित आहे. मात्र गुंतवणूक हाच केवळ पैसे वाढवण्याचा मार्ग आहे, असं नाही. तर सेव्हिंग म्हणजेच तुम्ही तुमच्याकडील पैशांची बचत कशी करता यावरही तुमची श्रीमंती अवलंबून आहे. तसेच हे बचत केलेले पैसे दीर्घ कालावधीसाठी योग्य पद्धतीने गुंतवल्यास लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो.
पैशांची बचत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांत लोकांचे उत्पन्न वाढले आहे. पण उत्पन्न वाढले असल्याने खर्चातही वाढ झाली आहे. खर्च करण्याच्या वाढत्या सवयीमुळे पैसे वाचवण्याची आणि गुंतवणुकीची सवय कमी होत आहे.
जाहीरातबाजीच्या जमान्यात खोट्या भूलथापांना बळी पडून लोक अवाढव्य खर्च करतात. त्यामूले खर्च करण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. विनाकारण खर्च करण्याची सवय घातक ठरू शकते. ही सवय तुमच्यासाठी अल्पावधीत आणि दीर्घकाळासाठी हानिकारक ठरू शकते.
खर्च केल्यानंतर मग जेव्हा घरखर्च, हफ्ते यांसाठी पैसा उरत नाही. तेव्हा मग लोकांना निद्रानाश, तणाव यांचा सामना करावा लागतो. काही लोक तर कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्याही करतात. अशा अडचणीत सापडण्यापेक्षा आधीच स्वत:ला काही सवयी लावून घेतल्या तर बरं होईल. त्यामूळेच आज पैसा खर्च करण्याच्या सवयी कोणत्या ते पाहुयात.
तूम्हीही अशा प्रसंगांना सामोरे जात असाल
तूम्हाला आवडत नसले तरी तूमच्या अचूक आर्थिक नियोजनासाठी बजेट बनवणे खूप महत्वाचे आहे. बजेटच्या माध्यमातून खर्चावर नियंत्रण ठेवता येते. परफेक्ट बजेटमूळे अनावश्यक खर्च टाळता येतो.तसेच, पैशांची अधिक बचत करता येते. जेवण, किराणा, जीवनावश्यक वस्तू आणि वाहतुकीचा खर्च, तसेच मनोरंजन, बाहेर खाणे इत्यादी कमी महत्वाच्या खर्चांचा समावेश असलेली यादी तयार करा.
कोणत्याही गोष्टीचे नियोजन केल्यास वेळही वाचतो आणि हव्या त्या वस्तूही पटकन लक्षात येतात. लक्षात ठेवा आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची पहिली पायरी आहे.
उत्साहात खरेदी करणे टाळा
बऱ्याचदा उत्साहाच्या भरात तूम्ही वस्तू खरेदी करता आणि नंतर उगीच घेतलं म्हणून पश्चाताप करत बसता. पण, अनावश्यक गोष्टींवर खर्च केल्यामुळे तुमची मासिक गुंतवणूक कमी होते. असे खर्च आपल्या बजेटच्या बाहेर असतात आणि आर्थिक उद्दिष्टांच्या मार्गात अडथळा ठरतात. अशा प्रकारे खर्च करण्याच्या स्वभावापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करा.
ऑनलाइन नोटीफिकेशन बंद करा
अनेकदा तुम्हाला ऑनलाइन डील आणि ऑफर्सची माहिती देणारे ईमेल पाठवले जातात. तूम्ही जिथे सर्च करत असता तिथूल नोटीफिकेशन येत असतात. त्यामूळे अति खर्च होतो. ते लोक तूम्ही एकदा एखादी वस्तू सर्च केलीत. सतत त्या रिलेटेड माहिती तूम्हाला ऑफरमध्ये पाठवत राहतात. त्यामूळे तूम्ही ते पाहता आणि खर्च करता.
एखाद्या जनरल स्टोअरमध्ये गेलात की तिथे जी वस्तू हवी ती पाहता, घेता आणि येता. पण एकदा का ऑनलाईन शॉपिंगची सवय लागली की मग तूम्ही तासंतास तिथे शॉपिंग करत बसता. त्यामूळे अशा ऍप्स आणि साईट्सवरील नोटीफिकेशन बंद करा.
बाहेर खाणे बंद करा
हॉटेलमध्ये खाणे किंवा कॉफीसाठी कॉफी शॉपला जाणे यासाठी आता काही कारण लागत नाही. म्हणजे अनेकजण मित्रांना भेटण्यासाठी किंवा कुटुंबाला ट्रीटमध्ये किंवा इतर कारणांसाठी हॉटेलिंगला प्राधान्य देतात. महिन्यात दोन तिनदा हॉटेलमध्ये खाणे काही अयोग्य नाही. मात्र सतत हॉटेल आणि बाहेर खाण्यावर होणाऱ्या खर्चाला आळा घालून तुम्ही महिन्याचे एक हजार रुपये जरी वाचवले तरी तुमचा भरपूर फायदा आहे
क्रेडीट कार्डचा वापर
जर तुम्ही सावधगिरीने क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर तुम्हाला कर्जाच्या तावडीत अडकवण्याचे हे सर्वात धोकादायक माध्यम आहे. कार्ड वापरण्यापूर्वी, त्याच्या अटी व शर्ती नीट वाचा. क्रेडिट कार्डचे बिल उशिराने भरल्याने मोठा दंड होऊ शकतो. तुमचे सेव्हिंग्ज कमी होऊ शकतात.
आजकाल, क्रेडिट कार्डचे मोठे बिल समान मासिक मार्ग (EMI) मार्गाने परत करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. हे टाळा कारण या EMI वर व्याज देखील आकारले जाते. जर तुम्ही वेळेवर ईएमआयची परतफेड करू शकत नसाल तर त्यामुळे तुमचे कर्ज वाढू शकते आणि व्याजाचा बोजाही वाढू शकतो.
सवयी बदला
हवेत पैसा उडवण्याचे माध्यम म्हणजे धुम्रपान. पैशांशिवाय आरोग्याला होणारी हानी आलीच. १० रुपयांची एक प्रमाणे दिवसाच्या २० सिगारेटचे पैसे सिगारेटवर न उडवता बाजूला काढून ठेवले तरी महिन्याचे सहा हजार रुपये वाचतात. प्रत्येक महिन्याला हेच सहा हजार आठ टक्के दराने गुंतवल्यास ४० वर्षांत चक्क गुंतवणूकदार दोन कोटींचा मालक होऊ शकतो.
खर्च करण्याआधी विचार करा
जर तुम्ही मॉलमध्ये खरेदी करत असाल आणि तुम्हाला एखादी गोष्ट दिसली जी खूप आकर्षक पण खूप महाग आहे. तुम्हाला त्याची गरज नाही, तर थोडा वेळ विचार करा की तुम्हाला ती खरेदी करायची आहे की नाही. जर उत्तर नाही असेल तर ते खरेदी करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.