बीएसईमधील जवळपास 9 शेअर्स असे आहेत ज्यांनी गेल्या 5 वर्षात छप्परफाड असा 500% पेक्षा जास्त रिटर्न त्यांच्या गुंतवणुकदारांना दिला आहे. पण प्रत्येकवेळी रिटर्न किती मिळाला याच्यापेक्षा वेगळा विचार करता यायलाा हवा. कारण त्या कंपनीचे फंडामेटल्स मजबूत असणे हे जास्त गरजेचे आहे. फंडामेंटल्सशिवाय कंपनीचा बिझनेस मॉडेल आणि व्यवस्थापन क्षमता यावर लक्ष ठेवले पाहिजे. या पॅरामीटर्सच्या आधारे, आम्ही अशा 9 कंपन्यांची निवड केली आहे ज्यांनी गेल्या 5 वर्षांत 500% परतावा दिला आहे. गेल्या 5 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही वर्षात या कंपन्यांना तोटा झाला नाही आणि ज्यांची विक्री 5 वर्षात वार्षिक 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
गेल्या 5 वर्षात या स्टॉकमध्ये 1073 टक्क्यांची वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी हा स्टॉक 408 रुपयांवर होता. तर 1 फेब्रुवारी 2022 रोजी हाच स्टॉक 4790 रुपयांवर पोहोचा. तरीही या शेअरचा उच्चांक हा 6133 रुपये राहिला आहे. या शेअरमध्ये त्याच्या उच्चांकाच्या 22 टक्क्यांनी घसरण आहे, तरी या शेअरने त्याच्या गुंतवणुकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे.
गेल्या 5 वर्षात हा स्टॉक 724 रुपयांवरून 7,462 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या काळात तब्बल 930 टक्क्यांची दमदार वाढ यात दिसून आली.
गेल्या 5 वर्षात या स्टॉकमध्ये 848 टक्के वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी हा स्टॉक 665 रुपयांवर होता, तर 1 फेब्रुवारी 2022 ला हा स्टॉक 6304 रुपयांवर बंद झाला. हा शेअर अजूनही 7595 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 17 टक्के खाली आहे.
गेल्या 5 वर्षात या स्टॉकमध्ये 796 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी हा स्टॉक 118 रुपयांवर होता तर 1 फेब्रुवारी 2022 रोजी हा स्टॉक 1062 रुपयांवर बंद झाला. हा स्टॉक अजूनही 1300 रुपयांना त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या 18 टक्क्यांनी कमी किंमतीवर उपलब्ध आहे
गेल्या 5 वर्षांत या स्टॉकमध्ये 786 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी हा स्टॉक 8 रुपयांवर होता. तर 1 फेब्रुवारी 2022 ला हा स्टॉक 73 रुपयांवर आला. हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 24 टक्क्यांपेक्षा कमी किंमतीवर अर्थात 95 रुपयांना मिळत आहे.
गेल्या 5 वर्षात या स्टॉकमध्ये 779 टक्के वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी हा स्टॉक 248 रुपयांवर होता तर 1 फेब्रुवारी 2022 रोजी स्टॉक 2,179 रुपयांवर बंद झाला. हा स्टॉक आता 2525 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 14 टक्क्यांच्या सवलतीवर उपलब्ध आहे.
गेल्या 5 वर्षांत या स्टॉकमध्ये 771 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी स्टॉक 457 रुपयांवर होता, तर 1 फेब्रुवारी 2022 रोजी स्टॉक 3,984 रुपयांवर बंद झाला. हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी 5,059 रुपयांववरून 21 टक्क्यांच्या डिस्काउंटवर सध्या उपलब्ध आहे.
गेल्या 5 वर्षांत या स्टॉकमध्ये 763 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी हा स्टॉक 78 रुपयांवर होता. तर 1 फेब्रुवारी 2022 रोजी हा स्टॉक 673 रुपयांवर बंद झाला. हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 14 टक्क्यांच्या डिस्काउंटवर सध्या उपलब्ध आहे.
गेल्या 5 वर्षांत या स्टॉकमध्ये 679 टक्क्यांची वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी 2017 रोजी स्टॉक 442 रुपयांवर दिसला होता, तर 1 फेब्रुवारी 2022 रोजी स्टॉक 3,440 रुपयांवर बंद झाला. 4,577 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून हा स्टॉक अजूनही 25 टक्के डिस्काउंटवर सध्या उपलब्ध आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.