मुंबई : मुख्यतः देशांतर्गत आर्थिक स्थिती सुधारत असल्याने गुंतवणुकदारांनी (investors) आज तुफान खरेदी केल्याने भारतीय शेअर बाजार (Indian share market) निर्देशांक दीड टक्क्यांहून जास्त वाढले. सेन्सेक्स (Sensex) 929.40 अंश तर निफ्टी (Nifty) 271.65 अंश वाढला. या खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा 59 हजारांचा टप्पा ओलांडला. (More than one and half percent coordinates n Indian share market)
आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 59,183.22 अंशांवर तर निफ्टी 17,625.70 अंशांवर स्थिरावला. निफ्टीच्या प्रमुख 50 शेअरपैकी फक्त सहांचे भाव पडले तर सेन्सेक्समधील 30 मुख्य शेअरपैकी फक्त पाचांचे भाव घसरले. आज बँका आणि वित्तसंस्थांचे शेअर वाढले तर औषधनिर्मिती क्षेत्राच्या शेअरचे भाव पडले.
डिसेंबरमधील जीएसटीचे विक्रमी संकलन, मोटारविक्रीची समाधानकारक आकडेवारी, उत्पादनक्षेत्रात झालेली वाढ आणि देशात अद्यापतरी फार मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन झाले नसल्याने गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवसात जोरदार तेजी अनुभवायला मिळाली.
आज सेन्सेक्समधील डॉ. रेड्डीज लॅब 55 रुपयांनी घसरून 4,853 रुपयांवर स्थिरावला. तर नेस्ले 37 रुपयांनी घसरून 19,671 रुपयांवर आला. टेक महिंद्र, टायटन व महिंद्र आणि महिंद्र हे शेअर किरकोळ घसरले. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह 583 रुपयांनी वाढून 16,973 रुपयांवर तर बजाज फायनान्स 245 रुपयांनी वाढून 7,222 रुपयांवर गेला. आयसीआयसीआय बँक (बंद भाव 764 रु.), टाटास्टील (1,143 रु.), इंडसइंड बँक (912), एचडीएफसी बँक (1,519), लार्सन अँड टुब्रो (1,922), टीसीएस (3,818), एचडीएफसी (2,635), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,404), अॅक्सिस बँक, स्टेटबँक यांचे भाव वाढले.
आजचे सोन्याचांदीचे भाव
सोने - 49,250 रु.
चांदी - 62,400 रु.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.