मुकेश अंबानी आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. नवीन वर्ष 2023 च्या सुरुवातीला त्यांनी आणखी एक मोठी कंपनी खरेदी केली आहे. रिलायन्स समुहाच्या रिलायन्स रिटेलने गुजरातमधील 100 वर्षे जुनी शीतपेय कंपनी सोसियो मधील 50 टक्के हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली आहे.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) गुजरात स्थित कार्बोनेटेड सोफ्ट ड्रिंक (CSD) आणि ज्यूस बनवणारी कंपनी Socio Hazuri Beverages Pvt Ltd (SHBPL) मध्ये 50 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने केलेली ही पहिली मोठी डील आहे.
रिलायन्सकडे कंपनीतील 50 टक्के भागभांडवल असेल आणि 100 वर्षे जुन्या शीतपेये बनवणाऱ्या कंपनीचे सध्याचे प्रवर्तक हजुरी कुटुंब कंपनीतील उर्वरित हिस्सा स्वतः जवळ ठेवला आहे.
सोस्यो हा जवळजवळ 100 वर्षे जुना कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स (CSD) आणि ज्यूसचा प्रतिष्ठित भारतीय ब्रँड आहे. याची सुरुवात 1923 मध्ये अब्बास अब्दुलरहीम हजुरी यांनी केली होती. ही फर्म देशांतर्गत शीतपेयांच्या बाजारपेठेतील मोठ्या ब्रँडपैकी एक आहे.
Sosyo, Kashmira, Lemee, Ginlim, Runner, Opener, Hajuri Soda आणि S'eau सारख्या ब्रँडसह कंपनीचे गुजरातमध्ये अस्तित्व आहे. कंपनीकडे सुमारे 100 फ्लेवर्स आहेत. आता या फर्मने देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्सला आपला 50 टक्के हिस्सा विकण्याचा करार केला आहे.
रिलायन्स व्यवसाय वाढवण्यासाठी या क्षेत्रात सतत नवनवीन डील करत आहे. मागच्या वर्षी कंपनीने कॅम्पा हा प्रतिष्ठित ब्रँड विकत घेतला होता. आता Sosyo चे अधिग्रहण रिलायन्स ग्रुपच्या RCPL द्वारे पूर्ण केले जाईल.
हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
RCPL हे FMCG युनिट आहे आणि देशातील आघाडीची रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची उपकंपनी आहे.
या डीलबाबत अब्बास हजुरी म्हणाले की, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्ससोबतच्या या भागीदारीत सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे.
आमच्या क्षमता एकत्र करून, आम्ही Sosyo ची अद्वितीय चव असलेली पेय उत्पादने भारतातील सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देऊ. आमच्या जवळपास 100 वर्षांच्या शीतपेयांच्या प्रवासातील हा एक निर्णायक क्षण आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.