Microsoft चे नाडेला, Google च्या पिचाईंना मागं टाकत BGI रँकिंगमध्ये अंबानी दुसऱ्या स्थानी!

गेल्या वर्षीचा टॉपर मायक्रोसॉफ्टचा सत्या नाडेला तिस-या क्रमांकावर आला आहे.
Brand Guardianship Index 2023
Brand Guardianship Index 2023 esakal
Updated on
Summary

निर्देशांकातील टॉप 10 लोकांपैकी बहुतांश भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. Adobe चे शंतनू नारायण चौथ्या तर सुंदर पिचाई पाचव्या स्थानावर आहेत.

Brand Guardianship Index 2023 : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि Google चे सुंदर पिचाई यांना मागं टाकलं आहे.

या निर्देशांकात मुकेश अंबानी भारतात पहिल्या आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. ब्रँड फायनान्सनं (Brand Finance) ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स प्रमाणंच स्वतःचा ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स तयार केला आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स त्याच्या कॉर्पोरेट ब्रँड मूल्यांकनाची रूपरेषा दर्शवितं. शिवाय, कंपन्यांच्या सीईओंच्या क्षमतेचं मोजमापही करतं.

Brand Guardianship Index 2023
Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या भावावर मोठी जबाबदारी; 'या' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

ब्रँड फायनान्सच्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स (BGI) 2023 मध्ये Nvidia चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग प्रथम आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर आले आहेत, असं अहवालात म्हटलंय.

Brand Guardianship Index 2023
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

टॉप 10 मध्ये सर्वाधिक लोक 'भारतीय'

या दोघांनी पहिले दोन स्थान पटकावले असून, गेल्या वर्षीचा टॉपर मायक्रोसॉफ्टचा सत्या नाडेला तिस-या क्रमांकावर आला आहे. निर्देशांकातील टॉप 10 लोकांपैकी बहुतांश भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. Adobe चे शंतनू नारायण चौथ्या तर सुंदर पिचाई पाचव्या स्थानावर आहेत.

Brand Guardianship Index 2023
Wrestlers Protest : क्रीडा मंत्र्यांची ब्रिजभूषण सिंहांविरुध्द मोठी कारवाई; राजीनाम्याबाबत दिला 24 तासांचा अल्टिमेटम

डेलॉइटचे पुनीत राजन सहाव्या तर टाटा समूहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन आठव्या क्रमांकावर आहेत. DBS चे पियुष गुप्ता नवव्या स्थानावर आहेत, तर Tencent चे Huateng Ma 10 व्या स्थानावर आहेत. महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा 23 व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 40 वर्षांपासून ते गटप्रमुखाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.