Stock Split : स्टॉक स्प्लिटनंतर या शेअरमध्ये तेजी, 6 महिन्यात 76% रिटर्न...

हायटेक पाईप्सने त्याचे शेअर्स 10:1 मध्ये स्प्लिट करण्याची घोषणा
Godrej Consumer Products shares
Godrej Consumer Products sharesesakal
Updated on

हायटेक पाईप्सने (Hi Tech Pipes) त्याचे शेअर्स 10:1 मध्ये स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी 6 टक्क्यांची शानदार तेजी पाहायला मिळाली. शेअर 944.10 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. बोर्डाने कंपनीचे सध्याचे इक्विटी शेअर्सचे विभाजन करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने एका फाइलिंगमध्ये म्हटले आहे. या अंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यूचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्समध्ये स्प्लिट केले जातील. मात्र, कंपनीने अद्याप यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही.

6 महिन्यात 76% रिटर्न

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक 11 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत 76 टक्क्यांनी जोरदार तेजी दिसली. इतकेच नाही तर गेल्या एका वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के परतावा दिला आहे. हाय-टेक पाईप ही स्टील प्रोसेसिंग कंपनी आहे जी जवळजवळ चार दशके स्टील पाईप्स, होलो सेक्शन, ट्यूब्स, कोल्ड रोल्ड कॉइल्स आणि स्ट्रिप्स, रोड क्रॅश बॅरियर्स आणि सोलर माउंटिंग स्ट्रक्चर्समध्ये उत्पादने प्रोव्हाईड करते.

Godrej Consumer Products shares
Budget 2024 : वित्तीय तूट म्हणजे काय? ती भरून काढण्यासाठी सरकार काय करतं?

तिमाही निकाल

हाय-टेक पाईप्सने नुकतेच डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या करानंतरच्या नफ्यात (पीएटी) तिसऱ्या तिमाहीत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत, कंपनीचा नफा13.02 कोटी इतका होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 10.17 कोटी होता. या व्यतिरिक्त, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 29 टक्क्यांनी वाढून Q3FY22 मध्ये 569 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो Q3FY22 मध्ये 440 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या 65,088 टनांच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत एकूण विक्रीचे प्रमाण 40% वाढून 91,232 टन झाले. कंपनीचा एबिटदा या तिमाहीत 12% वाढून 28.07 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी 25 कोटी होता.

Godrej Consumer Products shares
Share Market : गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! 'या' स्मॉलकॅप कंपनीने डिव्हिडेंड केला जाहीर, शेअरमागे मिळणार...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.