मुंबई बँक निवडणूक बिनविरोध ? सर्वपक्षीय संचालक मंडळ राहणार कायम

Bank election
Bank electionsakal media
Updated on

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच सोयीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक (bank election) बिनविरोध लढविण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे (All party leaders) एकमत झाले आहे. त्यामुळे सध्याचेच सर्वपक्षीय संचालक मंडळ पुन्हा सत्तेवर येईल, असा फॉर्म्युला (formula) तयार होत आहे.

Bank election
...तरीही कोविड काळात प्रदूषण धोकादायक पातळीवरच

या बँकेची पंचवार्षिक निवडणुक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी दादर येथे झालेल्या सर्वपक्षीय सहकार नेते-कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात वरील निर्णय घेण्यात आला आहे. आता त्याला शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंजुरी दिली की तो अमलात आणण्यासाठी पावले उचलली जातील, अशी माहिती या मेळाव्यास उपस्थित असलेल्या एका संचालकाने दिली.

सहकारी संस्था मतदार असलेल्या या बँकेच्या निवडणुकांसाठी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी एकच मतदान केंद्र असते. सहकारी संस्थांनी मतदानासाठी नियुक्त केलेले प्रतिनिधी बहुतांशी ज्येष्ठ नागरिकच असतात. सध्याच्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना तेथे येणे-आणणे हे चांगलेच त्रासाचे ठरणार आहे. प्रचार करणेही जिकिरीचे होणार आहे. तसेच सर्व मिळून या निवडणुकीसाठी बँकेचा एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे.

Bank election
महिला विशेष लसीकरणाला मुंबईत प्रतिसाद

बँकेची सध्याची नाजूक परिस्थिती विचारात घेता, हा खर्च आणि एकंदरीतच सर्व व्याप टाळण्यासाठी निवडणुक बिनविरोध करण्याकडे सर्वांचा कल तयार झाला. त्यामुळे एकाच पॅनलमधून सर्वपक्षीय (बहुदा सध्याच्याच) संचालकांना उभे केले जाईल. त्याखेरीज अन्य एक-दोन किरकोळ बाहेरचे उमेदवार उभे राहू शकतात, मात्र पाठिंब्याअभावी ते निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्याचेच संचालक मंडळ पुन्हा सत्तेवर येण्यात काहीच अडचण नाही, असेही काही संचालकांनी सांगितले. पदाधिकारी निवडण्याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असेही ठरविण्यात आले. सध्या बँकेवर 21 संचालक आहेत.

नव्या संचालक मंडळावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व सध्याचे बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, नितीन बनकर (भाजप), शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), सुनील राऊत, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार (शिवसेना), संदीप घनदाट, आणि जिजाबा पवार (काँग्रेस ) असे सर्वपक्षीय नेते नियुक्त होतील, अशी शक्यता आहे.

"बँकेच्या निवडणुका एकमताने व्हाव्यात यासाठी आम्हा सर्वांचेच गंभीरपणे प्रयत्न सुरु आहेत. कोविडची परिस्थिती तसेच सध्याचे आर्थिक संकट, त्रासलेले लोक अशा स्थितीत एकमताने निवडणुका झाल्या तर चांगलेच होईल"

- प्रवीण दरेकर, अध्यक्ष, मुंबई बँक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()