मुंबई : न्यायालयातील याचिकेसाठी PMC ठेवीदारांची बैठक

पीएमसी बँक ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी येत्या रविवारी वसई येथे ठेवीदारांची बैठक
PMC-Bank
PMC-Banksakal
Updated on

मुंबई: पीएमसी बँक ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी येत्या रविवारी (ता. १३) वसई येथे ठेवीदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेल्फेअर सोसायटीतर्फे पीएमसी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी दृकश्राव्य माध्यमातून ठेवीदारांच्या बैठका घेण्यात आल्या. मात्र आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने प्रत्यक्ष बैठक घेऊन त्वरेने याचिका करण्याबाबत चर्चा केली जाईल. पुढील आठवड्यात याबाबत प्रक्रिया पूर्ण केली जाईल

याबाबत ठेवीदारांना माहिती दिली जाईल, तसेच याचिकेत पक्षकार होऊ इच्छिणाऱ्यांची यादीही बैठकीत केली जाईल. ही माहिती सोसायटीचे सेक्रेटरी विश्वास उटगी यांनी कळविली आहे.

बैठकीचे ठिकाण - गुरुद्वारा श्री गुरू सिंह सभा वसई, (पश्चिम), वसई रेल्वे स्थानकाजवळ.

वेळ - सकाळी ११ वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.