Mutual Fund SIP चा कमाल! रोज 50 रुपये गुंतवा; 52 लाख होईल बचत

अगदी छोट्या छोट्या बचतीतून चांगला परतावा मिळू शकतो.
Mutual Fund
Mutual FundSakal
Updated on

Mutual Fund SIP Investment : म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) हा गुंतवणुकीचा (Investment) असा एक पर्याय आहे, ज्याद्वारे अगदी छोट्या छोट्या बचतीतून चांगला परतावा मिळू शकतो. एसआयपीमध्ये (SIP) लाँग टर्मला चक्रवाढीतून प्रचंड फायदा होतो. जर तुम्ही तुमची छोटीशी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर तुम्ही भविष्यात लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.

SIP गुंतवणुकीची पद्धतशीर पद्धत

SIP ही गुंतवणुकीची पद्धतशीर पद्धत आहे. सध्या बाजारात अनेक फंड आहेत जे लाँग टर्मला सरासरी किमान वार्षिक SIP परतावा 12 टक्के देत आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील तुलनेत जास्त आहे.

Mutual Fund
Mutual Funds Investment Tips: हवाय जास्त परतावा? 'या' टिप्स करा फॉलो

तुम्ही दररोज 50 रुपये वाचवले आणि दर महिन्याला SIPमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला, तर तुम्ही 20 वर्षांत 15 लाख रुपये आणि 30 वर्षांत 52 लाख रुपये सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंडातील लाँग टर्म गुंतवणुकीने सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

SIP: 20 आणि 30 वर्षांचा रिटर्न

20 वर्षात 15 लाख

समजा, तुम्ही दररोज 50 रुपये वाचवता, तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 1500 रुपयांची SIP केली आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 20 वर्षात रु. 15 लाखांचा निधी तयार कराल. या संपूर्ण कालावधीत, तुमची गुंतवणूक 3.6 लाख रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे 11.4 लाख रुपयांचा लाभ होईल.

Mutual Fund
Mutual Funds मध्ये कोणते शेअर्स खरेदी करणं ठरेल फायद्याचं

30 वर्षात 52 लाख

दुसरीकडे, जर तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी 1500 रुपयांची मासिक एसआयपी सुरू ठेवली आणि वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळवला, तर तुम्ही 52 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. यादरम्यान तुमची एकूण 5.4 लाख रुपयांची गुंतवणूक असेल. तर चक्रवाढीतून 47.5 लाख रुपयांची भर पडेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.