कोविड महासाथीच्या काळापासून गुंतवणूक पद्धतीमध्ये मूलभूत फरक झाल्याचे दिसून येत आहे. या काळात आपल्या सर्वांनाच बचतीचे महत्त्व लक्षात आले, तर दुसऱ्या बाजूला याच दरम्यान शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सर्वसामान्यांचा कल देखील वाढला आहे. अनेकांनी कोणत्याही अभ्यासाशिवाय आपल्याकडे बचत स्वरूपात किंवा इतर प्रकारात उपलब्ध असलेली रक्कम शेअर बाजारात गुंतविली. या गुंतवणुकीवर घसघशीत परतावा देखील कमावला. त्यामुळे शेअर बाजारात पैसे कमावणे सहजशक्य असल्याचे अनेकांना वाटत आहे. दुर्दैवाने, येथेच अनेकांची फसगत होत असून, या प्रकारे शेअर बाजाराकडे पाहण्याचा ‘माईंडसेट’ धोकादायक आहे.
गुंतवणूक करीत असताना आपण नेमक्या कोणत्या प्रकारात गुंतवणूक करीत आहोत, आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे, हे समजूनच गुंतवणूक केली पाहिजे. मुळात, शेअर बाजारातील घडामोडींकडे पुरेसा वेळ देणे शक्य नसलेल्या आणि त्यातील चढ-उतारांचा अभ्यास नसलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हाच गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
सद्यःस्थितीत शेअर बाजार दररोज नवनवीन उच्चांक अनुभवतो आहे. मात्र, त्याचवेळी अनेकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. बाजारातील थोड्याशा घसरणीने देखील अनेकांची झोप उडत आहे. तुमचा देखील हाच अनुभव असेल तर तुम्ही आताच सावध होणे गरजेचे आहे. चांगली गुंतवणूक ही नेहमीच तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्णत्वास नेऊन भरभराट साधणारी असते.
पहिल्या ‘लॉकडाउन’दरम्यान शेअर बाजारात प्रचंड अनिश्चितता होती. बाजार भांडवलामध्ये सातत्याने मोठी घसरण होत होती. घसरत्या बाजारात ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांच्या गुंतवणुकीत एका वर्षात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली. जे गुंतवणूक करू शकले नाहीत, त्यांनी मोठी संधी गमावली. सद्यःस्थितीत बाजार त्याच्या उच्चांकीवर असताना ‘प्रॉफिट बुक’ करणे शहाणपणाचे ठरणारे आहे. मात्र, ज्यांना ही संधी मिळाली नाही, ते देखील ‘एसआयपी’च्या (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) माध्यमातून त्यांची आर्थिक उद्दिष्टे सहजरित्या पूर्ण करू शकतात. ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करताना शेअर बाजारातील ‘टायमिंग’ साधण्याची आवश्यकता नसते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना शेअर बाजार उच्चांकीवर असेल, तर एनएव्ही (नेट ऍसेट व्हॅल्यू) जास्त असल्याने कमी युनिट्स मिळतात, तर घसरत्या शेअर बाजारात ‘एनएव्ही’ कमी होऊन जास्त युनिट्स मिळून दीर्घकाळामध्ये ‘बॅलन्स’ साधला जाऊन उत्तम परतावा प्राप्त होतो.
सद्यःस्थितीत शेअर बाजाराच्या उच्चांकी कामगिरीने प्रभावित होऊन आंधळेपणाचा मार्ग निवडण्याकडे अनेकांचा कल असताना, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) ‘सोच कर, समझ कर, इन्व्हेस्ट कर’ हे कॅम्पेन समजून घेण्याची गरज आहे; अन्यथा दीर्घकाळात तुमच्या गुंतवणुकीला मोठा फटका बसून, नाईलाजाने बँक एफडी, अल्पबचत योजना यांसारख्या प्रकाराकडे जाण्याची मानसिकता तयार होऊन चांगल्या गुंतवणूक पर्यायांपासून दूर राहावे लागते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ज्ञानार्जनात (ज्ञान/माहिती मिळविण्यासाठी) केलेली गुंतवणूक सर्वोत्तम परतावा देणारी असते, असे नेहमी म्हटले जाते.
गुंतवणुकीविषयी सखोल ज्ञान/माहिती मिळविण्यासाठी ‘इन्व्हेस्टर्स मीट’पेक्षा (गुंतवणूकदार परिसंवाद) दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून संबंधित विषयातील माहिती मिळविण्यासाठी ‘इन्व्हेस्टर्स मीट’ हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. ‘इन्व्हेस्टर्स मीट’ किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांमधील ‘आर्थिक साक्षरता’ वाढीस लावणे हे ‘सकाळ मनी’चे उद्दिष्ट असून, मागील अनेक वर्षांपासून ‘सकाळ मनी’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. कोरोना महासाथीच्या काळात त्याला ‘ब्रेक’ लागला असला तरी लवकरच आम्ही नावीन्यपूर्ण आणि गुंतवणूकदारांच्या ज्ञानात भर घालणारे उपक्रम घेऊन येत आहोत.
(लेखक ‘सकाळ मनी’चे बिझनेस हेड आहेत.)
‘सकाळ मनी’ आणि एचडीएफसी म्युच्युअल फंड आयोजित गुंतवणूकविषयक चर्चासत्र
विषय : शेअर बाजारातील नवनव्या उच्चांकाने तुमची उत्सुकता वाढतेय?
‘सेन्सेक्स’च्या उच्चांकामुळे तुम्हीदेखील आशावादी आहात?
‘सेन्सेक्स’च्या उच्चांकामुळे तुम्ही नर्व्हस झाला आहात?
प्रवेश ः मोफत (निःशुल्क)
वक्ता ः कृष्णा शर्मा, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट अँड नॅशनल लीड, एचडीएफसी एएमसी लि.
तारीख ः गुरुवार, १५ जुलै २०२१
वेळ ः सकाळी ११ वाजता
स्थळ ः ऑनलाईन
नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) ७३५०८ ७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
(डिस्क्लेमर ः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी योजनांसंबंधीची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)
‘इन्व्हेस्टर्स मीट’चे महत्त्व
‘सकाळ मनी’ने म्युच्युअल फंड जनजागृतीविषयी यापूर्वी २०१८ मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. मात्र, यावर्षी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याने ‘ऑनलाईन मीट’चे आयोजन केले जाणार आहे. ऑनलाईन कार्यक्रमाला देखील असाच मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. शेअर बाजारातील संधी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून कशा साध्य करायच्या, हे या कार्यक्रमातून घरबसल्या समजून घेता येईल. तुमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी मिस्ड कॉल दिल्यानंतर, तुम्हाला येणाऱ्या लिंकवर क्लिक करून ‘गुगल फॉर्म’मध्ये माहिती भरावी; जेणेकरून तुम्हाला कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.