मागच्या काही महिन्यात शेअर बाजाराने उच्चांक गाठला होता. इक्विटी मार्केटच्या या सुपर रॅलीमध्ये म्युच्युअल फंड्सची कामगिरीही चांगली राहिली. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी इक्विटी योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली.
Mutual Funds Stock : ऑक्टोबर महिना शेअर बाजारासाठी चांगला गेला. यादरम्यान सेन्सेक्सने पहिल्यांदाच 60 हजार आणि निफ्टीने 18000 ची पातळी तोडली. बाजाराने मागच्या महिन्यात अनेक रेकॉर्ड्स बनवले. मात्र, आता हाय व्हॅल्युएशनमुळे बाजारात काहीसा दबाव दिसून येत आहे. गेल्या महिन्यातील तेजीत अनेक सेक्टर्सचा वाटा आहे. इक्विटी मार्केटच्या या सुपर रॅलीमध्ये म्युच्युअल फंड्सची कामगिरीही चांगली झाली. गुंतवणूकदारांनी इक्विटी योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली. SIP मध्येही लोकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंड वेळोवेळी त्यांची रणनीती बदलत असतात. जेव्हा बाजार विक्रमी उच्चांकावर होता तेव्हा म्युच्युअल फंड्सने बँकींग सेक्टरवर सर्वात जास्त विश्वास ठेवला.
- कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढली, कोणत्या सेक्टरमध्ये घटली
ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंड्सच्या गुंतवणुकीचे धोरण पाहिल्यास, ज्या क्षेत्रांमध्ये मासिक आधारावर वेटेज वाढले, त्यामध्ये खासगी आणि PSU बँका, ऑटोमोबाईल्स, भांडवली वस्तू (Capital Goods), सिमेंट आणि रिटेल क्षेत्रांचा समावेश आहे. दुसरीकडे, आरोग्यसेवा, ग्राहक, उपयुक्तता, तेल आणि वायू, तंत्रज्ञान, रसायने, पायाभूत सुविधा आणि ग्राहक टिकाऊ वस्तू सामान्य वेटेज राहिले.
- खासगी बँकांवरील वेटेज 29 महिन्यांच्या उच्चांकावर
खासगी बँकांमधील वेटेज 17.7 टक्क्यांच्या 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. वार्षिक आधारावर 10 बेसिस पॉइंट्सच्या तुलनेत ते मासिक आधारावर 90 बेसिस पॉइंट्सनी वाढले आहे. हे सेक्टर सप्टेंबरमध्ये 29 महिन्यांच्या निचांकी पातळीवर होते. त्याच वेळी, पीएसयू बँकेतील वेटेज 20 महिन्यांसाठी 3.5 टक्क्यांवर पोहोचले आहे. वार्षिक आधारावर 150 बेसिस पॉईंट्सच्या तुलनेत मासिक आधारावर 30 बेसिस पॉईंट्सने वाढ झाली आहे. तर हेल्थकेअरवरील वेटेज सलग तिसऱ्या महिन्यात कमी झाला आहे आणि 6.9 टक्क्यांच्या 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात बीएफएसआय सेक्टरवर म्युच्युअल फंड्सचा विश्वास वाढला आहे. मासिक आधारावर सर्वाधिक वेटेज मिळालेल्या 10 शेअर्सपैकी 4 BFSI सेक्टरसोबत संबंधित आहेत. यामध्ये आयसीआयसीआय बँक (ICICI bank),एसबीआय (SBI),आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरंस (ICICI Lombard General Insurance) आणि एचडीएफसी (HDFC) यांचा समावेश आहे.
- या शेअर्समध्ये वेटेज घटले
टीसीएस (TCS),आयआरसीटीसी (IRCTC),एनटीपीसी (NTPC),कोल इंडिया (Coal India)आणि एचयुएल (HUL)
- इक्विटी AUM 13.5 लाख कोटी
ऑक्टोबर महिन्यात मासिक आधारावर डोमेस्टिक म्युच्युअल फंड (ELSSआणि इंडेक्स फंडसहित) ची इक्विटी AUM 1.5 टक्क्यांनी वाढून 13.5 लाख कोटी रुपये झाली असल्याचे ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या अहवालात म्हटले आहे. यादरम्यान निफ्टी 0.3 टक्क्यांनी वधारला. इक्विटी योजनांची विक्री मासिक आधारावर 19 टक्क्यांनी घसरून 33,100 कोटी रुपये झाली. एकूण म्युच्युअल फंड उद्योगाची AUM मासिक आधारावर 1.6 टक्क्यांनी वाढून 37.3 लाख कोटी झाली आहे. इक्विटी/इन्कम/बॅलेन्स फंडचे AUM मध्ये मासिक आधारावर 20500 कोटी/200000कोटी/14400 कोटीने वाढली आहे. तर मासिक आधारावर लिक्विड/आर्बिट्रेज फंडाच्या AUM मध्ये 5200 कोटी रुपये आणि 2000 कोटींनी घट झाली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.