Mutual Funds Tips : १० वर्षांत कमवा १ कोटी रुपये; दरमहा भरा एवढी रक्कम

म्युच्युअल फंडातील दहा वर्षांसाठी एसआयपी तुम्हाला किमान १२ टक्के वार्षिक व्याजदर देऊ शकते.
mutual fund
mutual fundgoogle
Updated on

मुंबई : आजच्या काळात महागाई खूप वाढली आहे. मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःचे घर बांधणे अशी अनेक कामे आहेत, ज्यामध्ये खूप पैसा खर्च होतो. या कामांसाठी पैसा गोळा करणे कोणालाही सोपे नाही. सामान्य पगारदार कर्मचाऱ्यासाठी ही समस्या फार मोठी आहे.

जर आपण शेअर बाजारात गुंतवणूक केली तर आपल्याला वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे लागते. खासगी क्षेत्रात काम करणारा कर्मचारी इतका वेळ काढू शकत नाही. शेअर बाजारातही मोठी जोखीम असते. प्रत्येकजण हा धोका पत्करू शकत नाही. तसेच, एखाद्या कर्मचाऱ्याकडे एकरकमी रक्कमही नसते, जी तो कुठेही गुंतवू शकतो.

mutual fund
Income tax return : ITR Filingची मुदत वाढण्याची वाट पाहात असल्यास हे वाचा

इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे

अशा परिस्थितीत इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमची छोटी बचत SIP च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. ज्या गुंतवणूकदारांना मोठा निधी जमा करायचा आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी एकरकमी रक्कम नाही, ते SIP द्वारे गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडातील दहा वर्षांसाठी एसआयपी तुम्हाला किमान १२ टक्के वार्षिक व्याजदर देऊ शकते.

mutual fund
वृद्धांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार ३६ हजार रुपये पेन्शन

वार्षिक स्टेप-अपचे अनुसरण करा

जर तुमची मुलं अजून लहान असतील आणि तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल तर तुम्ही १० वर्षांचे लक्ष्य ठेवू शकता. या दहा वर्षांच्या गुंतवणुकीतून तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्ही मासिक SIP मध्ये वार्षिक स्टेप-अप देखील वापरू शकता.

स्टेप-अप हे SIP चे वैशिष्ट्य आहे, जे विशिष्ट कालावधीनंतर SIP मध्ये तुमचे योगदान वाढवते. तुम्ही तुमची SIP रक्कम दरवर्षी काही टक्के वाढवू शकता. अशा प्रकारे तुम्ही वार्षिक वाढीद्वारे तुमचे उत्पन्न वाढवू शकता आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार SIP ची रक्कम वाढवू शकता. तथापि, येथे गुंतवणूकदार शक्य तितक्या कमी रकमेसह त्यांची गुंतवणूक सुरू करू शकतात.

या रकमेची एसआयपी केली जाईल

जेव्हा तुम्ही 10 वर्षांच्या SIP मधून 1 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असाल, तेव्हा तुम्ही वार्षिक स्टेप-अप 20 टक्के ठेवू शकता. SIP कॅल्क्युलेटरनुसार, येथे तुम्हाला 12 टक्के वार्षिक परताव्यासाठी 21,000 रुपयांच्या मासिक SIP ने सुरुवात करावी लागेल.

तुम्हाला किती परतावा मिळेल ते जाणून घ्या

जर मासिक एसआयपी 21,000 रुपये असेल, अंदाजे वार्षिक परताव्याचा दर 12 टक्के असेल आणि वार्षिक स्टेप-अप 20 टक्के असेल आणि कालावधी 10 वर्षे असेल, तर तुम्ही 1 कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, दहा वर्षांनंतर एकूण गुंतवणुकीची रक्कम 65,41,588 रुपये असेल आणि परताव्याची रक्कम 38,34,556 रुपये असेल. अशा प्रकारे तुमच्याकडे 1,03,76,144 रुपये निधी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.