आज रात्रीपासून National Highwaysवर प्रवास महागणार,10 ते 15 टक्के वाढला Toll Tax

toll
tollsakal
Updated on
Summary

1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर

छोट्या वाहनांच्या टोल टॅक्समध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ

नॅशनल हायवेवरील प्रवास गुरूवारी रात्री 12 वाजता महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने टोल टॅक्समध्ये 10 ते 65 रुपयांपर्यंत वाढवले आहे. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशाला झळ बसणार आहे.

toll
Gold Silver Price: सोनं अन् चांदी स्वस्त; दागिने खरेदी करण्यासाठी योग्य संधी

NHAI नुसार, दिल्लीतील सराय काले खान येथून चढणारी वाहने रसूलपूर सिक्रोड (अंतर 31 किमी) येथे उतरल्यास 100 रुपये टोल टॅक्स भरावा लागेल. जर तुम्ही सराय काले खान ते भोजपूर (अंतर 45 किलोमीटर) येथून खाली उतरलात तर तुम्हाला 130 रुपये टोल टॅक्स भरावा लागेल आणि शेवटच्या टोल प्लाझा काशी वरून खाली(अंतर 58.23 किलोमीटर) उतरल्यास तुम्हाला 155 रुपये द्यावे लागतील.

त्याचप्रमाणे, बस आणि ट्रकसाठी, तुम्हाला रसूलपूरसाठी 345 रुपये, भोजपूरसाठी 435 रुपये आणि मेन प्लाझा काशीसाठी 520 रुपये मोजावे लागतील.

toll
'हा' पीएसयू मेटल स्टॉक येत्या काळात आणखी वाढेल की कमी होईल?

सध्या 6 राष्ट्रीय महामार्ग लखनऊला जोडतात. यापैकी एकही टोल अद्याप हरदोई महामार्गावर लावण्यात आलेला नाही. ऑक्टोबरपासून सीतापूर महामार्गावरील टोल दरात बदल होणार आहे. पण कानपूर, अयोध्या, रायबरेली आणि सुलतानपूरला जाण्यासाठी तुम्हाला जास्त टोल टॅक्स भरावा लागेल.नवे दर आज रात्रीपासून लागू होतील.

लखनऊ-रायबरेली महामार्गावर (दक्षिण शेखपूर प्लाझा) आता तुम्हाला एका छोट्या खाजगी वाहनासाठी 105 रुपये मोजावे लागतील, तर दोन-एक्सल बस-ट्रकसाठी 360 रुपये मोजावे लागतील., त्याचप्रमाणे लखऊ अयोध्या महामार्गावर (नवाबगंज प्लाझा) आता छोट्या खासगी वाहनाला ११० रुपये मोजावे लागणार आहेत, तर बस-ट्रक ते एक्सलपर्यंत ३६५ रुपये मोजावे लागणार आहेत.

toll
DRDO Recruitment 2022: ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांवर भरती

लखनऊ -कानपूर महामार्गावर (नवाबगंज प्लाझा) आता तुम्हाला छोट्या खाजगी वाहनासाठी ९० रुपये मोजावे लागतील, तर बस-ट्रकच्या दोन एक्सलसाठी २९५ रुपये मोजावे लागतील.त्याचप्रमाणे, लखनऊ-सुलतानपूर महामार्गावर (बारा प्लाझा) आता छोट्या खाजगी वाहनासाठी ९५ रुपये मोजावे लागतील, तर दोन एक्सल असलेल्या बस-ट्रकसाठी ३२५ रुपये मोजावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.