पत्नीच्या नावे काढा 'हे' अकाउंट आणि दर महिना मिळवा तब्बल 44,793 रुपये

National-Pension-System.jpg
National-Pension-System.jpgSakal
Updated on

तुम्ही नोकरी करता आणि तुमची पत्नी गृहिणी आहे? अशात तुम्ही तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या भविष्याचा विचार नक्कीच केला असेल. आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित असावं असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं. अशात भविष्यात तुमची पत्नी कोणावर अवलंबून राहू नये, असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी पैशांची योग्य सोय करू शकतात. त्यासाठी पत्नीच्या नावे तुम्हाला 'न्यू पेंशन सिस्टम' म्हणजेच NPS अकाउंट उघडू ठेवावं लागेल. NPS अकाउंट तुमच्या पत्नीला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकरकमी पैसे तर देईल सोबतच दरमहा पेन्शन देखील देईल. NPS अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला किती पेन्शन घायचं आहे हे सुद्धा ठरवता येते. NPS खात्यामुळे तुमची पत्नी 60 वर्षानंतर म्हणजेच उतारवयात आत्मनिर्भर राहू शकेल. (National Pension Scheme (NPS) – NPS Login, Scheme & Benefits of NPS)

National-Pension-System.jpg
'हा' शेअर हिरा आहे हिरा; आताच घेऊन ठेवा, 'हिरा' नाही पण नफ्यानंतर सोनं नक्कीच घ्याल ?

NPS अकाउंट ओपन करा

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे न्यू पेंशन सिस्टम (NPS) अकाउंट सुरु करू शकता. यामध्ये तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला तुम्ही पैसे जमा करू शकता. प्रत्येक महिना किंवा वर्षात एकदाच, वार्षिकही पैसे जमा करता येतील. केवळ 1 हजार रुपयांनीही तुम्ही पत्नीच्या नावे NPS अकाउंट सुरु करू शकता. 60 वर्ष वय झाल्यानंतर NPS अकाउंट मॅच्युअर होते. नवीन नियमानुसार पत्नीचे वय 65 वर्ष होईपर्यंतही तुम्ही NPS अकाउंट सुरू ठेऊ शकता.

5000 रुपये दरमहा गुंतवणुकीपासून बनतील कोट्यवधी, असा आहे हिशोब

तुमच्या पत्नीचे वय 30 वर्ष आहे आणि तुम्ही त्यांच्या नावे NPS अकाउंटमध्ये दर महिन्याला 5000 जमा करता आहात. यामध्ये आपण गृहीत धरुयात की त्यावर वार्षिक टक्क्यांचा परतावा मिळत राहील. 60 वर्षांपर्यंत खटल्यात 1.12 कोटी जमा झालेले असतील. त्यांना यातील 45 लाख रुपये एकरकमी मिळतील. त्यानंतर दर महिना 45,000 रुपयांच्या आसपास पेन्शन मिळत राहील. हे पेन्शन त्यांना आजीवन मिळत राहील.

National-Pension-System.jpg
मेंदूविकारांच्या अचूक निदानासाठी न्यूरोशिल्ड विकसित करणारी इनमेड प्राेग्नाॅस्टिक्स

- वय- 30 वर्ष
- गुंतवणुकीचा कार्यकाळ - 30 वर्ष
- मंथली कॉन्ट्रीब्युशन- 5,000 रुपये
- गुंतवणुकीवर अंदाजे परतावा - वार्षिक 10 टक्के
- एकूण पेन्शन फंड - 1,11,98,471 रुपये मॅच्युरिटी झाल्यास काढता येतात
- 44,79,388 रुपये एन्युटी प्लान विकत घेण्याची रक्कम
- 67,19,083 रुपये

- अंदाजे एन्युटी रेट 8 टक्के
- दरमहा पेन्शन - 44,793 रुपये

फंड मॅनेजर करतात खात्याचा सांभाळ

NPS केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम आहे. या स्कीमध्ये तुम्ही जे पैसे गुंतवणूक करता त्याचा सांभाळ हा प्रोफेशनल फंड मॅनेजर कडून करण्यात येतो. NPS मध्ये तुमची गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आहे. या स्कीमच्या अंतर्गत तुम्ही जे पैसे गुंतवतात त्यावर वार्षिक किती परतावा मिळेल हे पक्कं नसतं. फाइनांशिअल प्लानर्सच्या म्हणण्यानुसार NPS ने सुरुवातीपासून आतापर्यंत वार्षिक 10 ते 11 टक्के परतावा दिलेला आहे.

National-Pension-System.jpg
१० हजारात सुरु करा स्वतःचा व्यवसाय; पहिल्याच महिन्यात कमवाल २५ ते ३० हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.