Bank Strike : बँकांच्या संप पुढे ढकलला

राष्ट्रीयकृत बँकांमधील कामाच्या आउटसोर्सिंग बाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तडजोड झाल्याने उद्याचा देशव्यापी बँक संप तहकूब करण्यात आला आहे.
bank Strike
bank Strike sakal
Updated on
Summary

राष्ट्रीयकृत बँकांमधील कामाच्या आउटसोर्सिंग बाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तडजोड झाल्याने उद्याचा देशव्यापी बँक संप तहकूब करण्यात आला आहे.

मुंबई - राष्ट्रीयकृत बँकांमधील कामाच्या आउटसोर्सिंग बाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तडजोड झाल्याने उद्याचा देशव्यापी बँक संप तहकूब करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याच्या उपायांचा भाग म्हणून उद्या (शनिवारी) देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. यासंदर्भात तडजोडीसाठी या आधीची बैठक निष्फळ ठरली होती.

मात्र आज झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने उद्याचा संपत तहकूब करण्यात आल्याची माहिती बँक कर्मचारी संघटनांचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे. बँकांमधील काम आऊटसोर्स करण्याबाबत कर्मचाऱ्यांना प्रतिकूल निर्णय इतक्यात घेतला जाणार नाही असे आश्वासन आज सरकारतर्फे देण्यात आले. त्यामुळे संप तहकूब करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.