New Parliament : नवीन संसदेत अधिवेशनाची तयारी सुरू; नव्या वास्तूचे फोटो आले समोर, अर्थसंकल्पही...?

केंद्रातील मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसद भवनात आयोजित करण्याचा प्रयत्नात आहे.
New Parliament
New ParliamentSakal
Updated on

Inside Picture Of New Parliament : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसद भवनात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे.

नवीन संसद भवनाचे दालन तयार झाले आहे. लोकसभा सभागृहाच्या आतील फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये लोकसभा अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे संयुक्त अभिभाषण करण्याची तयारी करत आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही संसदेच्या नवीन सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळी नवीन इमारतीत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.

New Parliament
New ParliamentSakal

नवीन संसद भवन सध्याच्या संसद भवनापेक्षा मोठे, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. 64,500 चौरस मीटरमध्ये बांधले जाणारे नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट करत आहे.

संसद भवनाच्या नवीन इमारतीमध्ये दृकश्राव्य प्रणाली तसेच डेटा नेटवर्क सुविधेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

New Parliament
Nitin Gadkari : वाहन चालकांसाठी नितीन गडकरी आणणार नवा कायद; आता ट्रक चालकांनी...
New Parliament
New ParliamentSakal

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1,224 खासदार बसण्याची सोय आहे. म्हणजेच एकावेळी 1,224 खासदार बसू शकतात. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात.

नवीन इमारतीत मध्यवर्ती हॉल असणार नाही. दोन्ही सभागृहांच्या खासदारांना लोकसभेच्या सभागृहातच बसता येणार आहे. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.

New Parliament
New ParliamentSakal

संसदेच्या नवीन इमारतीत लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. नवीन चार मजली संसद भवन बांधण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.