New Rule : SBI आणि HDFC बँकेने करोडो ग्राहकांसाठी बदलले नियम; जाणून घ्या काय आहेत नियम

जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) किंवा एचडीएफसी बँक (HDFC) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
HDFC
HDFCSakal
Updated on

जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) किंवा एचडीएफसी बँक (HDFC) मध्ये असेल आणि तुमच्याकडे संबंधित बँकांचे क्रेडिट कार्डही असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

दोन्ही बँकांनी 1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. या अंतर्गत ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक फायदे आणि सुविधा देण्याचा उद्देश आहे. क्रेडिट कार्ड वापरण्यावर उपलब्ध असलेल्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला आहे.

यापूर्वी क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्याच्या शुल्काच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. दोन्ही बँकांनी 1 जानेवारी 2023 पासून नवीन नियम लागू केले आहेत. बँकेकडून क्रेडिट कार्ड फी आणि रिवॉर्ड पॉइंट प्रोग्राममध्ये बदल करण्यात आले आहेत.

एकूण रकमेपैकी 1 टक्के रक्कम थर्ड पार्टी मर्चंटद्वारे रेंट पेमेंटवर भरावी लागेल. बँकेच्या म्हणण्यानुसार, रेंटच्या पेमेंटसाठी सर्व कार्डांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध नसतील. शिक्षणाशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

एचडीएफसीने हॉटेल आणि तिकीट बुकिंगवर रिवॉर्ड पॉइंट सिस्टम बदलली आहे. क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध असलेली रिवॉर्ड पॉइंट सिस्टम देखील SBI ने बदलली आहे.

एसबीआयच्या म्हणण्यानुसार, ई-कॉमर्स वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंगवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटमध्ये बदल करण्यात आला आहे. SBI कार्डच्या बाजूने BookMyShow, Cleartrip, Apollo 24X7, EazyDiner, Lenskart आणि Netmeds वर ऑनलाइन खर्चावर 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

HDFC
Free TV : मोफत रेशननंतर आता तुमचा टीव्ही पाहण्याचाही खर्च उचलणार केंद्र सरकार!

SBI ने 15 नोव्हेंबर 2022 पासून प्रोसेसिंग फी चार्ज आधीच सुधारित केला आहे. याशिवाय सर्व व्यापारी ईएमआयवर प्रक्रिया शुल्क 199 रुपये + कर असा केला आहे. हे शुल्क पूर्वी ९९ रुपये + कर असे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()