प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी महत्वाचे निर्णय लागू केले जातात. सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय यामध्ये असतात. यातील काही निर्णय दिलासा देणारे ठरू शकतात, तर काही निर्णय लोकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारे असू शकतात.
आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मोठे बदल होणार आहेत, जे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. 1 डिसेंबरपासून कोणते मोठे बदल होणार आहेत ते पाहूया.
हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...
1) एलपीजी सिलेंडरची किंमत :
गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलत असतात. त्यामुळे 1 डिसेंबर 2022 पासून एलपीजी सिलेंडरच्या दरातही बदल दिसून येतील. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आता लोकांना एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा आहे.
२) जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे :
पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. त्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. देय तारखेपर्यंत तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते. त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही.
3) ATM मधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल :
1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीतही बदल होणार आहेत. पंजाब नॅशनल बँक (PNB) महिन्याच्या सुरुवातीला एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल करू शकते. तुम्ही बँकेच्या एटीएममध्ये कार्ड टाकताच तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, एटीएम स्क्रीनवर दिलेल्या कॉलममध्ये कोड टाकल्यानंतरच कॅश बाहेर येईल.
4) डिजिटल रुपया येणार :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 1 डिसेंबरपासून रिटेलसाठी डिजिटल रुपया लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. यादरम्यान, ई-रुपी वितरण आणि वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल. यापूर्वी केंद्रीय बँकेने 1 नोव्हेंबर रोजी घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता. केंद्रीय बँकेच्या या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) असे नाव देण्यात आले आहे. उद्यापासून देशातील निवडक ठिकाणी याची चाचणी केली जाईल. ज्यामध्ये ग्राहकापासून ते व्यापाऱ्यापर्यंत ई-रुपी वापरत येईल.
5) बँक 13 दिवस बंद :
डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर रिझर्व्ह बँकेने जारी केलेली सुट्ट्यांची यादी पाहूनच घराबाहेर पडा. असे होऊ नये की तुम्ही बँकेत पोहोचलात आणि बँक बंद असेल. डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. पण या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत. म्हणूनच आरबीआयच्या वेबसाइटवरून बँकांच्या सुट्ट्यांची तपासा आणि त्यानुसार नियोजन बनवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.