GST Council meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामन यांच्या नेतृत्वाखाली ‘जीएसटी कौन्सिल’ची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लहान मुलांसाठीच्या दोन जीवनावश्यक औषधावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. औषधी वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यात कँन्सरवरील औषधांचा समावेश असून 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सध्या पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी या बैठकितील महत्वाच्या मुद्यांवर झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. त्यानूसार कोरोनाशी संबंधित औषधांवरील जीएसटीच्या सवलतीची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मालगाडी वाहतूक परवाना धारकांना दिलासा मिळाला असून, त्यावर आता कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागू होणार नाही. सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमातील 75 टक्के खर्च जीएसटी मूक्त करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले आहे.
केरळ उच्च न्यायालयाने जूनमध्ये एका जनहित याचिकेवर निकाल देताना पेट्रोल व डिझेल ‘जीएसटी’च्या कक्षेत आणण्याबाबत जीएसटी कौन्सिलने विचार करावा, असे म्हटले होते. आज होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार होता, त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून होते. या विषयावर चर्चा झाली मात्र सध्या पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत येणार नसल्याचे निर्मला सितारमन यांनी सांगितल्याने सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.