सेन्सेक्स-निफ्टीच्या 3 दिवसांच्या तेजीला अखेर ब्रेक लागला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजार घसरणीसह बंद झाला. आयटी आणि रियल्टीमुळे बाजारावर सर्वाधिक दबाव राहिला. तर दुसरीकडे फ्लॅट ओपनिंगनंतर बाजारावर विक्रीचा दबाव वाढला . व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 770 अंकांनी अर्थात 1.29 टक्क्यांनी घसरून 58,788.02 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 219.80 अंक अर्थात 1.24 टक्क्यांनी घसरून 17,560.20 वर बंद झाला. (Share Market Latest Updates)
युरो झोनमध्ये अपेक्षेपेक्षा महागाई वाढल्याने बाजारावर परिणाम झाल्याचे LKP सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. त्यामुळे आयटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रचंड विक्रीमुळे सेन्सेक्स-निफ्टी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. ऑटो वगळता जवळपास सर्व निर्देशांक लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद झाले.
आज बाजाराची स्थिती कशी असेल ?
निफ्टीसाठी 17530-17500 च्या झोनमध्ये सपोर्ट असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी 17500 च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर तो आणखी वर जाईल. वर, निफ्टीसाठी 17700-17800 वर रझिस्टेंस आहे. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 17400 च्या वर राहील तोपर्यंत तो तेजीत राहील असे ते म्हणाले.
17800 ची पातळी निफ्टीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंट्सचे मनीष हथिरामानी म्हणाले. निफ्टीला 17200 वर मजबूत सपोर्ट आहे. हा आधार तुटला तर त्यात आणखी कमजोरी दिसून येते.
निफ्टी यावेळी शॉर्ट टर्म कंसोलिडेशनच्या फेजमध्ये गेल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. निफ्टीसाठी खाली 17200 वर एक महत्त्वाचा सपोर्ट आहे तर 17800 वर निफ्टीसाठी रझिस्टेंस आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स ?
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)डिवीस लॅबोरेटरी (DIVISLAB)मारुती (MARUTI )आयटीसी (ITC)टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR) अशोक लेलँड (ASHOKLEY) व्होल्टास (VOLTAS) टाटा पॉवर (TATAPOWER) बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.