Amartya Sen : अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल, असे म्हटले आहे.
ते म्हणाले, “काँग्रेस खूप कमकुवत झाली आहे असे दिसते आणि मला माहित नाही की काँग्रेसवर किती विश्वास ठेवता येईल. कारण काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत."
कोलकाता येथे झालेल्या मुलाखतीत सेन म्हणाले की, ''2024 च्या सार्वत्रिक निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बाजूने असतील असा विचार करणे चुकीचे आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनेक प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.''
ते पुढे म्हणाले की, ''तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे भारताच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता असली तरी, ते भाजपच्या विरोधातील लोकांना आकर्षित करू शकतील की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मला वाटते की भाजपची जागा घेऊ शकणारा दुसरा कोणताही पक्ष नाही, असे मानणे चुकीचे ठरेल. कारण भाजपने स्वत:ला हिंदूंचे वर्चस्व असलेला पक्ष म्हणून स्थापित केले आहे.''
सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्रावरील त्यांच्या कार्यासाठी 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचे कार्य समाजातील सर्वात मूलभूत आणि महत्त्वपूर्ण संसाधने आणि त्यांचे विभाजन या प्रश्नाशी संबंधित होते.
हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...
सेन यांनी अशा वेळी वक्तव्य केले आहे. ज्यावेळी अनेक विरोधी नेत्यांनी भाजपच्या विरोधात एकजुटी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि जनता दल-युनायटेड (JD-U) यासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह नवीन आघाडीची मागणी केली आहे. द्वीपक्षीय लढतीमुळे भाजपचा पराभव निश्चित होईल, यावर त्यांनी मुलाखतीत भर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.