अदानी विल्मर IPO आजपासून खुला! अधिक माहिती जाणून घेऊया

अदानी विल्मरची देशातील सर्वात मोठी अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची कंपनी बनण्याचे स्वप्न आहे.
Adani Wilmar IPO
Adani Wilmar IPOSakal
Updated on
Summary

अदानी विल्मरची देशातील सर्वात मोठी अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची कंपनी बनण्याचे स्वप्न आहे.

Adani Wilmar IPO : तेल क्षेत्रातील कंपनी अदानी विल्मरचा (AWL) 3,600 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आज खुला झाला आहे. अदानी विल्मर कंपनीचा आयपीओ (IPO) 31 जानेवारीला बंद होईल. आयपीओसाठी (IPO) प्राईस बँड 218 ते 230 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. अदानी विल्मर हा अहमदाबादचा अदानी ग्रुप आणि सिंगापूरच्या विल्मर ग्रुपचा 50:50 संयुक्त उपक्रम आहे. याआधी मंगळवारी अदानी विल्मरने अँकर गुंतवणूकदारांकडून 940 कोटी रुपये जमा केले होते. कंपनीने 230 रुपये प्रति शेअर या दराने अँकर गुंतवणूकदारांना 4.09 कोटी इक्विटी शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी विल्मरची देशातील सर्वात मोठी अन्न आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची कंपनी बनण्याचे स्वप्न आहे.

Adani Wilmar IPO
'आयपीओ' मध्ये गुंतवणूक ठरतेय आनंदाची पर्वणी

आयपीओसाठी (IPO) लॉट साइज

कंपनीने आयपीओसाठी (IPO) 65 शेअर्सचा लॉट साइज ठेवला आहे. 230 रुपयांच्या प्राइस बँडनुसार किमान 14,950 रुपये गुंतवावे लागतील. तर, जास्तीत जास्त 1, 94,350 रुपये गुंतवता येतील. कंपनीचे व्हॅल्युएशन 26287 कोटी रुपये आहे.

Adani Wilmar IPO
Paytm IPO: पेटीएमचा आयपीओ येणार; काय असेल किंमत? जाणून घ्या

अदानी विल्मरने आयपीओमध्ये (IPO) पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified institutional buyers) 50 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non institutional buyers) 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के राखीव ठेवण्यात आलेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.