ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे बाजारात घसरण! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

मॉडेर्नाच्या विधानानंतर बाजारात विक्रीचा जोर आला आणि निफ्टी वरच्या पातळीपासून 340 अंकांनी घसरला.
share market
share marketesakal
Updated on
Summary

मॉडेर्नाच्या विधानानंतर बाजारात विक्रीचा जोर आला आणि निफ्टी वरच्या पातळीपासून 340 अंकांनी घसरला.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मंगळवारीही मार्केट चिंतेत होते. शेअर बाजार उघडला तेव्हा चांगली स्थिती होती पण नंतर पुन्हा बाजार ढेपाळला. Moderna ने ओमिक्रॉनवर लस कमी प्रभावी असल्याचे म्हटले. मॉडेर्नाच्या विधानानंतर बाजारात विक्रीचा जोर आला आणि निफ्टी वरच्या पातळीपासून 340 अंकांनी घसरला. त्याच वेळी, सेन्सेक्स वरच्या पातळीपासून 1,119 अंकांनी घसरला. निफ्टी बँक उच्च पातळीवरून 1079 अंकांनी घसरला.

बँकिंग, धातू, ऊर्जा, वाहन शेअर्सची सर्वाधिक विक्री झाली. त्याचबरोबर आयटी, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी 71 अंकांनी घसरून 16,983 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 281 अंकांनी घसरून 35,695 वर बंद झाला.मिडकॅप 135 अंकांनी घसरून 29,651 वर बंद झाला. सेन्सेक्स 196 अंकांनी घसरून 57,065 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स घसरले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 29 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 9 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी कमजोर होऊन 75.16 वर बंद झाला.

share market
दीर्घ कालावधीत भरघोस रिटर्न्स देणारे शेअर्स! मार्केटमध्ये करा गुंतवणूक

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर लॉन्ग अप्पर शॅडोसोबत बियरिश इंव्हर्टेड हॅमरसारखी कँडल तयार केला आहे. जोपर्यंत निफ्टी 17,200 च्या खाली राहील, तोपर्यंत प्रत्येक उसळीवर विक्री होईल आणि निफ्टीची कमजोरी 16,800 -16,500 पर्यंत जाऊ शकते असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. निफ्टीसाठी मिडीयम टर्म हर्डल 17,350 -17,500 च्या झोनमध्ये दिसतो.निफ्टीने डेली चार्टवर बियरिश कँडल तयार केली आहे, जी पुढील ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टीसाठी कमजोरीचे संकेत देते.

निफ्टी 21 आणि 9 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली बंद झाल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. MACD आणि Stochastic सारखे डेली मोमेंटम इंडिकेटर मंगळवारी नकारात्मक क्रॉसओव्हरसह व्यापार करत होते. निफ्टीला 16,800 च्या पातळीवर सपोर्ट आहे असे पलक कोठारी यांचे म्हणणे आहे. जर हा सपोर्ट तुटला तर तो 16,600-16,500 च्या दिशेने जाताना दिसतो.वरच्या बाजूस, 17,350 वर रेझिस्टेन्स दिसून येतो. तर बँक निफ्टीला 35,300 वर सपोर्ट आणि 37,000 वर रेझिस्टेन्स आहे.

share market
Go Fashionचे शेअर्स वधारले! गुंतवणूकदारांना तब्बल 91 टक्क्यांचा परतावा

बुधवारच्या सुरुवातीच्या व्यापारात, बाजार प्रथम GDP आकड्यांवर आपली प्रतिक्रिया देईल असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. त्यानंतर मग 1 डिसेंबरपासूनच ऑटोचे आकडेही यायला सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटमुळे बाजारात अस्थिरता कायम राहील हे लक्षात असू द्या.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- पॉवर ग्रीड (POWERGRID)

- श्री सिमेंट (SHREECEM)

- बजाज फिनसर्व्ह (BAJAJAFINSV)

- टायटन (TITAN)

- टाटा कंझ्यूमर्स (TATACONSUME)

- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (RECLTD)

- भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

- ॲस्ट्रल (ASTRAL)

- टोरंट पॉवर (TORNTPOWER)

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.