देशातील ३५ टक्के म्हणजेच एक तृतियांश सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारातील उद्योग (एमएसएमई) बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर ३७ टक्के स्वतंत्र व्यवसाय (स्वयंरोजगारीत) बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशनच्या (एआयएमओ) पाहणी अहवालातून समोर आली आहे.
कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मोठा फटका देशातील एमएसएमई उद्योगांना बसला आहे. नजीकच्या काळात कोणतेही पुनरुज्जीवन या उद्योगांना दृष्टीपथावर दिसत नसल्याचे एक तृतियांश एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
तर इतर ३२ टक्के एमएसएमई उद्योगांना असे वाटते आहे की जवळपास ६ महिन्यांत व्यवसाय सुरळीत होईल आणि फक्त १२ टक्के एमएसएमईना असे वाटते की फक्त तीनच महिन्यात उद्योग सुरळीत होईल. कोविड-१९मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि व्यवसायांवर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. त्यात सर्वाधिक फटका एमएसएमईना बसला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेली आर्थिक मदतदेखील अजून एमएसएमईपर्यत पोचली नसल्याचे या पाहणी अहवालातून पुढे आले आहे. याशिवाय जाहीर करण्यात आलेली मदत पुरेशी नसल्याचेही मत समोर आले आहे.
केंद्र सरकारने एमएसएमईकरता जाहीर केलेली आर्थिक मदत ही स्टार्टअपना लागू होत नाही आणि स्टार्टअपचे देशातील एमएसएमई क्षेत्रातील प्रमाण ११ टक्के इतके आहे. इतक्या मोठ्या पातळीवर व्यवसायांना फटका बसणे हे अभूतपूर्व असेच आहे.
'भारतात जवळपास ६.५ कोटी एमएसएमई आहेत ज्यातून १५ कोटी लोकांना रोजगार मिळतो आणि जवळपास १३ कोटी लोक स्वयंरोजगारीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यवसायांची वाताहत देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम बघायला मिळते आहे', असे मत एआयएमओचे माजी अध्यक्ष के ई रघुनाथन यांनी व्यक्त केले आहे. हा सर्व्हे, ऑनलाईन पद्धतीने २४ मे ते ३० मे या दरम्यान करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.