कोरोना, लॉकडाऊनमुळे बऱ्याच इंडस्ट्रीजची डिमांड कमी झाली आहे. त्यातल्या त्यात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये परिस्थीती बदलत चालली आहे. जूनमध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांची वॉल्यूम अंदाजापेक्षा जास्त होती. ब्रोकरेज फर्म Emkay ला लॉकडाऊन खुला झाल्याने आणि डिमांड वाढल्याने दुसऱ्या तिमाहीतही वॉल्युम वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म Emkay ने ऑटोमोबाईल कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. (opportunity to earn handsome money from auto stocks note targets)
Maruti Suzuki - टारगेटः 8,500 रुपये :वाढ - 12 टक्के
लॉकडाऊन खुला झाल्याने आणि कार्सच्या चांगल्या डिमांडमुळे दुसऱ्या तिमाहीत सेल्स आणखी वाढू शकतो.
Mahindra & Mahindra - वाढ: 17 टक्के
या आर्थिक वर्षात मजबूत डिमांड, काही मॉडल्ससाठी वेटिंग पीरियड आणि कमी डिलर इनव्हेंटरीने वॉल्यूम ग्रोथ 30 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. फार्म सेगमेंटमध्ये चांगला बेस आणि कमी सरकारी सबसिडी या सगळ्यामुळे वॉल्यूम कमजोर राहील असा अंदाज आहे.
Escorts - टारगेटः 1,240 रुपये -वाढ: 3 टक्के
Ashok Leyland - टारगेटः 155 रुपये- वाढ: 27 टक्के
या अर्थिक वर्षात कमर्शिअल गाड्यांच्या वॉल्यूम ग्रोथमध्ये चांगली वाढ दिसून येण्याचा अंदाज आहे. यात रिप्लेसमेंट डिमांड, सरकारकडून इंफ्रास्ट्रक्चरवर होणार वाढीव खर्च, आणि लाइट कमर्शियल वेहिकलच्या नव्या मॉडल्सच्या लॉन्चसाठी मदत मिळेल.
Tata Motors - टारगेटः 410 रुपये- वाढ : 19 टक्के
यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीची वॉल्यूम 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकते असा अंदाज आहे. पॅसेंजर वेहिकल सोबतच कमर्शियल वेहिकलच्या डिमांडमध्ये वाढ होईल असे दिसत आहे.
Eicher Motors - टारगेटः 3,180 रुपये -वाढ : 20 टक्के
Bajaj Auto - टारगेटः 4,340 रुपये- वाढ : 4 टक्के
कंपनीला एक्सपोर्टसाठी बरीच डिमांड आहे. त्यात वॉल्यूममध्येही चांगली वाढ अपेक्षित आहे. अनलॉक झाल्याने डोमेस्टिक सेल्समध्ये वाढ होईल अशी आशा आहे.
Hero MotoCorp - टारगेटः 3,870 रुपये- वाढ : 32 टक्के
TVS Motor - टारगेटः 730 रुपये- वाढ : 32 टक्के
या आर्थिक वर्षात एक्सपोर्टमध्ये वाढ अशीच राहील असा अंदाज आहे. अनलॉक झाल्याने डोमेस्टिक सेल्ससुधा आणखी वाढू शकतो.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.