येत्या दोन महिन्यांत 30 कंपन्यांचे IPO येणार? 45,000 कोटी उभारणार

ipo
ipo Sakal
Updated on
Summary

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची लिस्ट मोठी आहे.

- शिल्पा गुजर

यावर्षी आतापर्यंत 40 कंपन्यांनी इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे (IPO) 64,217 कोटी रुपये मिळवले आहेत. यावर्षी अनेक आयपीओ आले आहेत आणि अजून येत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची लिस्ट मोठी आहे. किमान 30 कंपन्या आयपीओच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपयांहून जास्त किंमतीचा निधी मिळवण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात मोठ्या संख्येने तंत्रज्ञान (Technology) कंपन्यांचा समावेश आहे.

ipo
आधार कार्डद्वारे पर्सनल लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या...

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato)यशस्वी आयपीओमुळे मॉडर्न टेक कंपन्यांना प्रोत्साहन मिळत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पॉलिसीबाजार (6,017 कोटी रुपये), अॅमक्युअर फार्मास्युटिकल्स (4,500 कोटी रुपये), नायका (4,000कोटी रुपये), मोबिक्विक सिस्टम्स (1,900 कोटी रुपये), स्टरलाइट पावर (1,250 करोड़ कोटी रुपये), फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (1,330 कोटी रुपये) और सुप्रिया लाइफसायन्सेस (1,200 कोटी रुपये) यांसारख्या कंपन्यांचे आयपीओ येऊ शकतात.

ipo
भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सचा यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये डंका

यावर्षी आतापर्यंत 40 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 64,217 कोटी रुपये मिळवले आहेत. आदित्य बिर्ला सन लाइफचा आयपीओ 29 सप्टेंबरला येतो आहे. त्यातून कंपनी 2,778 कोटी रुपये जमा करेल. शेअर बाजार नवीन उच्चांक गाठतोय, शिवाय प्राथमिक बाजारात (Primary Market)चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेक कंपन्या आयपीओद्वारे निधी मिळवण्याच्या तयारीत असल्याचे ट्रेडस्मार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंघानिया म्हणाले.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()